IPL Records : आयपीएलच्या इतिहासातील 5 अतूट रेकॉर्ड्स

| Updated on: Apr 17, 2024 | 6:17 PM

IPL 2024 : आयपीएलचा 17 वा हंगाम ऐतिहासित ठरताना दिसतोय. या हंगामात आतापर्यंत अनेक रेकॉर्ड्स उध्वस्त झाले आहेत. सनरायजर्स हैदराबादने तब्बल 2 वेळा सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम मोडीत काढला. आतापर्यंत आयपीएलमध्ये अनब्रेकेबल असलेल्या रेकॉर्ड्सबद्दल जाणून घेऊयात.

1 / 5
आयपीएलच्या इतिहासातील अतूट विक्रमांच्या यादीत ख्रिस गेल याच्या विस्फोटक खेळीचा समावेश आहे.  ख्रिस गेल याने 2013 साली आरसीबीकडून पुणे वॉरियर्स विरुद्ध अवघ्या 30 बॉलच्या मदतीने शतक ठोकून 66 बॉलमध्ये 175 धावांची झंझावाती खेळी केली होती. गेलच्या या तोडू खेळीत 17 सिक्स आणि 13 चौकारांचा समावेश होता.  तेव्हापासून ते आतापर्यंत गेलचा हा विक्रम अबाधित आहे.

2 / 5
तसेच गिलने 30 बॉलमध्ये ठोकलेलं शतक हे अद्याप आयपीएलच्या इतिहासातील वेगवान शतक आहे. वेगवान शतकाबाबत यूसुफ पठाण हा दुसऱ्या स्थानी आहे. यूसुफने 37 बॉलमध्ये शतकी खेळी केली होती.

3 / 5
आयपीएलमध्ये सर्वोत्तम बॉलिंगचा विक्रम हा मुंबईकडून अल्झारी जोसेफ याने 2019 साली केला होता. अल्झारीने 3.4 ओव्हरमध्ये 12 धावांच्या मोबदल्यात 6 विकेट्स घेतल्या होत्या. अल्झारीने यासह सोहेल तन्वीर याचा रेकॉर्ड ब्रेक केला होता. तन्वीरने 2008 मध्ये 4 ओव्हरमध्ये 14 धावा देऊन 6 विकेट्स घेतल्या होत्या.

4 / 5
कोलकाता नाईट रायडर्स टीमच्या नावावरही रेकॉर्ड आहे. केकेआरने 2014 साली गौतम गंभीर याच्या नेतृत्वात सलग 9 सामने जिंकून आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. इतकंच नाही, तर 2015 साली पहिला सामना जिंकत केकेआरने सलग 10 सामन्यांचा विक्रम केला होता, तो अद्याप अबाधित आहे.

5 / 5
आयपीएलच्या 17 व्या मोसमाआधी सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम हा आरसीबीच्या नावावर होता. आरसीबीने 2013 मध्ये पुणे विरुद्ध 263 धावा ठोकल्या होत्या. मात्र हा विक्रम या 17 व्या हंगामात 3 वेळा उध्वस्त झाला. हैदराबादने आधी मुंबई विरुद्ध 277 धावा केल्या. त्यानंतर आरसीबी विरुद्ध 287 धावा ठोकल्या. तर केकेआर सर्वाधिक धावसंख्येबाबत तिसऱ्या स्थानी आहे. केकेआरने 3 एप्रिलला दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध 272 धावा ठोकल्या होत्या.