
आयर्लंडचा कर्णधार पॉल स्टर्लिंगने टी20 क्रिकेट इतिहासात एका मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे. यापूर्वी हा विक्रम रोहित शर्माच्या नावावर होता. पण आता पॉल स्टर्लिंगने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. युएईविरुद्ध सामना खेळण्यासाठी उतरताच हा विक्रम नोंदवला गेला. (PC-PTI)

आयर्लंडचा कर्णधार पॉल स्टर्लिंग हा सर्वाधिक टी20 आंतरराष्ट्रीय सामना खेळणारा खेळाडू ठरला आहे. रोहित शर्माने 159 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तसेच या फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता स्टर्लिंगने 160 टी20 सामने खेळून हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. पण विक्रमी सामन्यात पॉलची बॅट काही चालली नाही आणि 8 धावा करून बाद झाला. (PC-PTI)

पॉल स्टर्लिंगने 160 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 3874 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 26पेक्षा जास्ता आहे. त्याने एक शतक आणि 24 अर्धशतकं ठोकली आहेत. यावेळी त्याने 140 षटकार आणि 445 चौकार मारले आहेत. (PC-PTI)

पॉल स्टर्लिंगने 15 जून 2009 मध्ये पाकिस्तानविरुद्ध पहिला टी20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तर 2008 पासून आंतरराष्ट्रीय सामने खेळत आहे. न्यूझीलंडविरुद्ध 1 जुलै 2008 रोजी पहिला वनडे सामना खेळला होता. (PC-PTI)

वेगवेगळ्या फॉर्मेटबाबत बोलायचं तर सचिन तेंडुलकर वनडे आणि कसोटीत सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू आहे. सचिनने 200 कसोटी आणि 463 वनडे सामने खेळले आहेत. (PC-PTI)