
भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी20 सामन्यात 5 गडी गमवून 271 धावा केल्या. तसेच विजयासाठी 272 धावांचं आव्हान दिलं. यात मोलाचा वाटा राहिला तो इशान किशनचा.. त्याच्या झंझावाती शतकामुळे भारताला धावांचा पल्ला गाठता आला. (Photo- BCCI Twitter)

संजू सॅमसन 6 धावा करून बाद झाल्यानंतर इशान किशन मैदानात उतरला. इशान किशनने मिळालेल्या संधीचं सोनं केलं. मागच्या सामन्यात त्याला बेंचवर बसावं लागलं होतं. पण यावेळी त्याने पूर्ण वसुली केली. 28 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर त्याचा शतकाच्या दिशेने प्रवास सुरू झाला. (Photo- BCCI Twitter)

इशान किशनने अर्धशतक ठोकल्यानंतर पुढच्या 14 चेंडूत शतक साजरं केलं. त्याने 42 चेंडूत शतक पूर्ण केलं. अर्धशतक ठोकल्यानंतर त्याला पुढच्या 50 धावांचा टप्पा गाठण्यासाठी फक्त 14 चेंडू लागले. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात त्याचा आक्रमक अंदाज अधिक तीव्र दिसला. (Photo- BCCI Twitter)

इशान किशनने या सामन्यात 43 चेंडूंचा सामना केला आणि 103 धावांची खेळी केली. इशान किशनने त्याच्या शानदार शतकी खेळीदरम्यान एकूण 6 चौकार आणि 10 षटकार मारले. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 239.53 चा होता. (Photo- BCCI Twitter)

इशान किशनने भारतासाठी पाचवं वेगवान शतक ठोकलं. तर न्यूझीलंडविरुद्धचं हे पहिलं वेगवान शतक ठरलं आहे. टी20 फॉर्मेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बाबतीत इशान किशन आता भारतासाठी संयुक्तपणे चौथ्या स्थानावर आहे. इशान किशनचं हे सातवं शतक आहे. (Photo- BCCI Twitter)