IND vs WI : वेस्ट इंडिजचा कंजूष गोलंदाज, ज्याच्यासमोर रोहित-इशान आणि विराटही हतबल

| Updated on: Feb 20, 2022 | 11:48 PM

भारत दौऱ्यावर वेस्ट इंडिजचा संघ पूर्णपणे निष्प्रभ दिसला. एकदिवसीय मालिकेनंतर टी-20 मालिकेतही भारताने विंडीजवर क्लीन स्विप विजय मिळवला. मात्र, टी-20 मालिकेत विंडीजच्या एका गोलंदाजाने सर्वांचं लक्ष वेधलं, याचे प्रमुख कारण म्हणजे या गोलंदाजाने विराट कोहली, रोहित शर्मा आणि इशान किशन सारख्या फलंदाजांच्या हैराण केलं आहे.

1 / 4
भारत दौऱ्यावर वेस्ट इंडिजचा संघ पूर्णपणे निष्प्रभ दिसला. एकदिवसीय मालिकेनंतर टी-20 मालिकेतही भारताने विंडीजवर क्लीन स्विप विजय मिळवला. मात्र, टी-20 मालिकेत विंडीजच्या एका गोलंदाजाने सर्वांचं लक्ष वेधलं, याचे प्रमुख कारण म्हणजे या गोलंदाजाने विराट कोहली, रोहित शर्मा आणि इशान किशन यांसारख्या बलाढ्य फलंदाजांच्या नाकीनऊ आणले आहे. या गोलंदाजाचं नाव आहे रॉस्टन चेस. या ऑफस्पिनरने मालिकेत केवळ विकेटच घेतल्या नाहीत तर धावा देण्यातही कंजूषपणा दाखवला. (Photo: PTI)

2 / 4
या T20 मालिकेत, भारतीय संघाची वरची फळी मोठ्या खेळी खेळण्यात अपयशी ठरली, तसेच मधल्या षटकांमध्येही सहज धावा झाल्या नाहीत. त्याचे एक मोठे कारण म्हणजे फिरकीपटू रॉस्टन चेस, जो पॉवरप्लेपासून सलग 4 षटकांच्या स्पेलमध्ये विकेट घेत होता तसेच धावांवर लगाम घालत होता. पहिल्या सामन्यात चेसने 4 षटकात अवघ्या 14 धावा देऊन रोहित शर्मा आणि इशान किशनचे बळी घेतले. (Photo: BCCI)

3 / 4
त्यानंतर पुढच्या सामन्यातही चेसने धुमाकूळ घातला आणि त्याने 4 षटकात 25 धावा देत 3 बळी घेतले. पुन्हा एकदा रोहित त्याचा बळी ठरला, तर विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव या दोघांनाही त्याने पव्हेलियनचा रस्ता दाखवला. चेसचा हाच पराक्रम आजच्या सामन्यातही दिसून आला, ज्यात त्याने इशान किशनला 23 धावांवर पॅव्हेलियनमध्ये धाडले. (Photo: BCCI)

4 / 4
चेसने या मालिकेत 10.33 च्या सरासरीने 6 विकेट घेतल्या. यादरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट अवघा 5.16 इतका होता. विशेष म्हणजे या मालिकेपूर्वी चेसने 3 टी-20 सामन्यात एकही विकेट घेतली नव्हती. या मालिकेत चेसने रोहित आणि ईशानला 2-2 वेळा आपला बळी बनवले. (Photo: BCCI)