48 सामन्यातील 91 डावात जसप्रीत बुमराहचं नकोसं शतक

चौथ्या कसोटी सामन्यावर इंग्लंडने मजबूत पकड मिळवली आहे. कारण इंग्लंडने घेतलेली 250 हून अधिक धावांची आघाडी मोडून काढणं सोपं नाही. त्यामुळे भारताचा पराभव हा क्रीडाप्रेमींनी आधीच मान्य केला आहे. यातून फक्त चमत्कारच वाचवू शकतो. या सामन्यात जसप्रीत बुमराहच्या वाटेला नको ते आलं.

| Updated on: Jul 26, 2025 | 4:58 PM
1 / 5
भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहची जादू मँचेस्टर कसोटी सामन्यात काही चालली नाही. तसेच या सामन्यात महागडा गोलंदाज ठरला आहे. त्याने या कसोटीच्या पहिल्या डावात 100 हून अधिक धावा दिल्या आहेत. (फोटो- बीसीसीआय)

2 / 5
इंग्लंडने पहिल्या डावात 250 हून अधिका धावांची आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारताचा प्रत्येक गोलंदाज महागडा ठरला आहे. जसप्रीत बुमराहने सात वर्षांच्या करिअरमध्ये इतका वाईट दिवस पहिल्यांदाच पाहिला आहे. (फोटो- बीसीसीआय)

3 / 5
जसप्रीत बुमराह या मालिकेत सुरुवातीला चांगली गोलंदाजी करेली होती. पहिल्या सामन्यात पाच विकेट घेतल्या. त्यानंतर लॉर्ड्स कसोटीतही पाच विकेट नावावर केल्या. मात्र मँचेस्टर कसोटीत तसं काही घडलं नाही. (फोटो- बीसीसीआय)

4 / 5
चौथ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी जसप्रीत बुमराह वैयक्तिक 32वं षटक टाकण्यासाठी आला. त्याच्या पहिल्याच चेंडूवर बेन स्टोक्सने एक धाव घेतली. यानंतर भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने कसोटीत नकोसं शतक ठोकलं. (फोटो- बीसीसीआय)

5 / 5
2018 मध्ये दक्षिण अफ्रिकेविरुद्ध कसोटीत पदार्पण केल्यानंतर एकदाही 100 चा आकडा गाठला नव्हता. डिसेंबर 2024 मेलबर्न कसोटीत 99 धावा दिल्या होत्या. मात्र 48 व्या कसोटीच्या 91व्या डावात बुमराहाने 100 धावा दिल्या. (फोटो- बीसीसीआय)