बुमराहने लॉर्ड्सवर अर्धवट राहिलेलं स्वप्न पूर्ण केलं, झालं असं की…

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतही जसप्रीत बुमराह नावाचं वादळ घोंघावलं. त्याने इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत पाठवला. तसेच विदेशात पाच बळी घेण्यााच विक्रम 13व्यांदा केला. अशी कामगिरी करताना त्याने एक मोठं स्वप्न पूर्ण केलं.

| Updated on: Jul 11, 2025 | 8:33 PM
1 / 6
इंग्लंड दौऱ्यात दोन सामन्यात जसप्रीत बुमराहने पाच गडी बाद करण्याचा विक्रम रचला आहे. पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात अशी कामगिरी केली होती. त्यानंतर लॉर्ड्सवरील कसोटी मालिकेतील पहिल्या डावात पाच बळी घेतले. (Photo- BCCI Twitter)

2 / 6
इंग्लंडचे पाच गडी बाद केल्यानंतर जसप्रीत बुमराह विदेशात सर्वाधिक पाच बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने अशी कामगिरी 13व्यांदा केली आहे. बुमराहने त्याच्या कारकिर्दीत इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक पाच बळी घेण्याचा विक्रमही केला आहे. (Photo- BCCI Twitter)

3 / 6
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी फक्त एक विकेट घेतली होती. मात्र दुसर्‍या दिवशी त्याने चार जणांना तंबूचा रस्ता दाखवला. बेन स्टोक्सला बाद केल्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर ख्रिस वोक्सला बाद केले. त्यानंतर शतकवीर जो रूटही बाद झाला. बुमराहने 7 चेंडूत तीन गडी बाद केले. त्यानंतर जोफ्रा आर्चरला बाद केले आणि पाच बळी पूर्ण केले. (Photo- BCCI Twitter)

4 / 6
जसप्रीत बुमराहने इंग्लंडविरुद्ध पाचव्यांदा पाच विकेट घेतल्या आहेत. इंग्लंडविरुद्ध त्याची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने चार वेळा पाच विकेट घेतल्या आहेत. इतकंच काय तर इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक कसोटी विकेट घेण्याचा मानही त्याच्याकडे आहे. (Photo- BCCI Twitter)

5 / 6
इंग्लंडविरुद्ध पाच विकेट घेत जसप्रीत बुमराहने एक स्वप्नही पूर्ण केलं आहे. लॉर्ड्सवर पहिल्यांदाच पाच विकेट घेत पराक्रम केला आहे. बुमराहचे नाव आता लॉर्ड्सच्या बोर्डवर कोरले जाणार आहे. (Photo- BCCI Twitter)

6 / 6
जसप्रीत बुमराहने विदेशात 13 वेळा पाच बळी घेण्याचा विक्रम केला आहे. यासह त्याने कपिल देवचा विक्रम मोडला आहे. तसेच वसीम अक्रमच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. वसीम अक्रमने सेना देशांमध्ये (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) 13 वेळा पाच विकेट्स घेतल्या आहेत. (Photo- BCCI Twitter)