1..2..3..4…14 ! जसप्रीत बुमराहने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा या खेळाडूला केलं बाद

जसप्रीत बुमराह नावाचं इंग्लंडमध्ये प्रभावी पडताना दिसत आहे. पहिल्या डावात इंग्लंडच्या खेळाडूंनी जम बसवला असताना जसप्रीत बुमराहने तीन जणांना तंबूत पाठवलं. यात एका दिग्गज खेळाडूला कसोटी क्रिकेटमध्ये तंबूत पाठवण्याची 14वी वेळ होती.

| Updated on: Jun 22, 2025 | 3:37 PM
1 / 5
इंग्लंडमध्ये जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीपुढे इंग्लंडचे फलंदाज टिकाव धरत नसल्याचं स्पष्ट दिसून आलं आहे.पहिल्या डावाच्या दुसऱ्या दिवशी जसप्रीत बुमराहने तीन गडी बाद केले. यात शेवटची विकेट ही जो रूटची होती. (Photo: Getty Images/BCCI)

2 / 5
जो रूटला बाद केल्यानंतर जसप्रीत बुमराहचा गिऱ्हाईक असल्याची चर्चा रंगली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा बाद केलेला खेळाडू जो रूट असल्याची चर्चा रंगली आहे. चला जाणून घेऊयात आकडेवारी (Photo: Getty Images/BCCI)

3 / 5
कसोटी क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराह आणि जो रूट हे 25वेळा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. जो रूटने या काळात बुमराहच्या 570 चेंडूंचा सामना केला आहे. तसेच 290 धावा काढल्या आहेत. पण  बुमराहने त्याला 10 वेळा तंबूचा रस्ता दाखवला आहे. (Photo: Getty Images/BCCI)

4 / 5
जसप्रीत बुमराहने कसोटीत सर्वाधिक वेळा बाद केलेला खेळाडू हा जो रूट आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने जो रूटला सर्वाधिक वेळा बाद करण्याची किमया साधली आहे. त्याने त्याला 11 वेळा बाद केले आहे. (Photo: Getty Images/BCCI)

5 / 5
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराहने जो रूटला 14 वेळा बाद केले आहे. त्यामुळे  पॅट कमिन्स त्याच्या मागे आहे. दुसऱ्या डावातही जो रूटची विकेट मिळाली तर कसोटीत क्रिकेटमध्ये बरोबरी साधेल. (Photo: Getty Images/BCCI)