ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात जसप्रीत बुमराह ठोकणार ‘शतक’

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसर्‍या टी20 सामन्यात भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला नवा विक्रम प्रस्थापित करण्याची संधी आहे. जसप्रीत बुमराह विकेटचं शतक साजरं करू शकतो. यासाठी त्याला फक्त चार विकेटची आवश्यकता आहे.

| Updated on: Oct 30, 2025 | 3:34 PM
1 / 5
भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. आता दुसरा टी20 सामना 31 ऑक्टोबरला मेलबर्न मैदानात होणार आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराहकडे एक मोठा विक्रम रचण्याची संधी आहे. (Photo- BCCI Twitter)

2 / 5
जसप्रीत बुमराह टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विकेटचं शतक पूर्ण करू शकतो. यासाठी त्याला फक्त 4 विकेट्सची आवश्यकता आहे. त्याने आतापर्यंत 76 टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 96 विकेट घेतल्या आहेत. (Photo- BCCI Twitter)

3 / 5
ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार विकेट बाद करताच जसप्रीत बुमराहच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 विकेट पूर्ण होणार आहेत. अशी कामगिरी करणारा भारताचा दुसरा गोलंदाज ठरणार आहे. अर्शदीप सिंगने भारतासाठी आतापर्यंत 101 विकेट घेतल्या आहेत. (Photo- BCCI Twitter)

4 / 5
जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या मालिकेत विकेट्सचं शतक पूर्ण करू शकला नाही, तरी त्याच्याकडे या मालिकेत संधी आहे. कारण या मालिकेत अजून 4 सामन्यांची खेळ शिल्लक आहे. त्यामुळे या चार सामन्यात 4 विकेट आरामात घेऊ शकतो.  (Photo- BCCI Twitter)

5 / 5
जसप्रीत बुमराहने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2016 मध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर संघात त्याचं महत्त्वाचं स्थान आहे. त्याने टी20 वर्ल्डकप 2024 मध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. त्याने एकूण 15 विकेट घेतल्या होत्या. (Photo- PTI)