
तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात जो रूटची बॅट काही तळपली नाही. पण 12 धावा करताच त्याने एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू कुमार संगकाराचा विक्रम मोडीत काढला आहे.

कुमार संगकाराने कसोटीत 12400 धावा केल्या आहेत. पण आता या धावांच्या पुढे जो रूट गेला आहे. त्याच्या नावावर आता 12402 धावा आहेत. कसोटी सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत जो रूट सहावा क्रमांकावर आला आहे.

कसोटी सर्वाधिक धावांचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने 15921 धावा केल्या आहेत. रिकी पाँटिंग 13378, जॅक कॅलिस 13289, राहुल द्रविड 13288, एलिस्टर कुक 12472, जो रूट 12402 आणि कुमार संगकाराने 12400 धावा केल्या आहेत.

दुसरीकडे, पहिल्या डावात जो रूटने कामिंदु मेंडिसचा झेल पकडला आणि एक विक्रम नावावर केला आहे. कसोटीत सर्वाधिक झेल घेणारा तिसरा खेळाडू ठरला आहे. तसे

जॅक कॅलिसने कसोटीत 200 झेल घेतले होते. पण आता जो रूटच्या नावावर 201 विकेट आहेत. राहुल द्रविडच्या नावावर 210, महेला जयवर्धनेच्या नावावर 205 झेल आहेत.