सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम संकटात! जो रूटने साधली बरोबरी, आता ऐतिहासिक नोंद करण्याच्या वेशीवर

इंग्लंड संघाचा कसोटी कर्णधार गेल्या काही वर्षात जबरदस्त फॉर्मात आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. आता त्याच्या रडारवर सचिन तेंडुलकरचा एक मोठा विक्रम आहे. पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात पहिल्याच डावात या विक्रमाची बरोबरी साधली आहे.

| Updated on: Aug 21, 2026 | 3:04 PM
1 / 5
इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. या मालिकेतील पहिला सामना लीड्सवर सुरू आहे. सामन्यातील पहिल्या डावात कर्णधार जो रूटने कमाल फलंदाजी केली आणि ऐतिहासिक नोंद केली. त्याने पहिल्या डावात 66 धावा करत इतिहास रचला आहे. (Photo: PTI)

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. या मालिकेतील पहिला सामना लीड्सवर सुरू आहे. सामन्यातील पहिल्या डावात कर्णधार जो रूटने कमाल फलंदाजी केली आणि ऐतिहासिक नोंद केली. त्याने पहिल्या डावात 66 धावा करत इतिहास रचला आहे. (Photo: PTI)

2 / 5

जो रूटने कसोटी क्रिकेटमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या सर्वाधिक अर्धशतकांच्या विक्रमाची बरोबरी साधली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये जो रूट 167 वा सामना खेळत असून 305 डावात ही कामगिरी केली आहे. त्याने 68वं अर्धशतक साजरं केलं. (Photo: PTI)

3 / 5

सचिन तेंडुलकरने 200 कसोटी सामन्यात 68 अर्धशतकं ठोकली होती. आता जो रूटने आणखी एक अर्धशतक ठोकलं की सचिनच्या पुढे निघून जाईल. पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेतच हा विक्रम जो रूट आपल्या नावावर करेल. (Photo: PTI)

4 / 5

जो रूट ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगचा एक मोठा विक्रम मोडू शकतो. घरच्या मैदानावर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम मोडण्याच्या अवघ्या 3 धावा दूर आहे. पाकिस्तानच्या दुसऱ्या डावात फलंदाजी आली तर हा विक्रम सहज शक्य आहे. (Photo: PTI)

5 / 5

कर्णधार म्हणून जो रूटने आणखी एक कारनामा केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 42वी अर्धशतकी खेळी केली आहे. यासह त्याने वेस्ट इंडिजचा महान कर्णधार क्लाइव लॉयड यांना मागे टाकलं आहे. यासह कसोटी कर्णधार म्हणून सर्वाधिक 50हून अधिक धावा करणाऱ्या कर्णधारांच्या टॉप 5 यादीत सहभागी झाला आहे. (Photo: PTI)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us