
आयपीएल 2026 स्पर्धेत मोईन अलीने न खेळण्याचा निर्णय घेतला. मिनी लिलावापूर्वीच त्याने आयपीएलला रामराम ठोकला आहे. मोईन अली मागच्या पर्वात केकेआरकडून खेळला होता. त्याच्यासाठी केकेआरने 2 कोटी मोजले होते. पण या हंगामापूर्वी त्याला रिलीज केलं होतं. (Photo- PTI)

मोईन अलीने 2026 मध्ये आयपीएलऐवजी पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळण्याची घोषणा केली आहे. मोईन अलीने सांगितले की, ही त्याच्या कारकिर्दीची एक नवीन सुरुवात आहे आणि तो पीएसएलमध्ये खेळण्यास खूप उत्सुक आहे. (Photo- BCCI/IPL)

मोईन अली आयपीएल 2025 मध्ये सहा सामने खेळला होता. यात फक्त पाच धावा केल्या आणि सहा विकेट घेतल्या होत्या. मोईन अली हा आयपीएल सोडणारा दुसरा खेळाडू आहे. त्याच्या आधी फाफ डू प्लेसिसनेही आयपीएलपेक्षा पीएसएलला पसंती दिली. (Photo- BCCI/IPL)

पाकिस्तान सुपर लीगचे कौतुक करताना मोईन अली म्हणाले, " नवीन सुरुवात करण्याची ही योग्य वेळ आहे. पाकिस्तान सुपर लीगच्या नवीन युगात सामील होण्यास मी खूप उत्सुक आहे. पाकिस्तान सुपर लीग हे टी-२० क्रिकेटमधील एक प्रमुख नाव आहे कारण ते जागतिक दर्जाचे प्रतिभावान खेळाडू निर्माण करते. " (Photo- BCCI/IPL)

मोईन अलीने 2018 मध्ये या स्पर्धेत पदार्पण केले होते. मोईन अली चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडूनही खेळला आहे. मोईन अलीने गेल्या सात वर्षांत आयपीएलमधून 46.10 कोटी कमावले. 2021 मध्ये चेन्नई सुपर किंग्जने तब्बल 7 कोटीला विकत घेतले. 2022 ते 2024 पर्यंत चेन्नईसोबत राहिला आणि प्रत्येक हंगामात 8 कोटी कमावत होता. (Photo- BCCI/IPL)