
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा वनडे सामना सुरु आहे या सामन्यात केएल राहुलची बॅट चांगलीच तळपली. त्याच्या खेळीमुळे टीम इंडियाने 50 षटकात 7 गडी गमवून 284 धावा केल्या. तसेच विजयासाठी 285 धावांचं आव्हान दिलं. (Photo: BCCI Twitter)

केएल राहुलने 87 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकार मारत शतक पूर्ण केलं. त्याने त्याच्या वनडे कारकिर्दीतील आठवं शतकं ठोकलं. तसेच मोहम्मद अझरूद्दीनचा शतकाचा विक्रम मोडला आणि शुबमन गिलच्या शतकाच्या विक्रमाची बरोबरी केली. (Photo: BCCI Twitter)

केएल राहुलने षटकार मारून वनडे कारकिर्दीतील आठवं शतकं ठोकलं. न्यूझीलंडविरुद्ध हे दुसरं वनडे शतक आहे. तर पाचव्या क्रमांकावर उतरून तिसऱ्यांदा शतक ठोकलं. केएल राहुलने 92 चेंडूत 11 चौकार आणि 1 षटकार मारत नाबाद 112 धावा केल्या.(Photo: BCCI Twitter)

केएल राहुलने पाचव्या स्थानावर उतरून टीम इंडियाला सावरलं. केएल राहुलने भारताकडून नववर्ष 2026 मध्ये पहिलं शतक ठोकलं आहे. विशेष म्हणजे दोन वर्षानंतर केएल राहुलने शतकी खेळी केली आहे. (Photo: BCCI Twitter)

केएल राहुलने संकटमोचक म्हणून भूमिका बजावली. 115 धावांवर श्रेयस अय्यरच्या रुपाने तिसरा धक्का बसला आणि केएल राहुल उतरला. त्यानंतर 118 धावा असताना विराट कोहली बाद झाला. त्यामुळे संघ संकटात आला होता. पण त्यानंतर केएल राहुलने रवींद्र जडेजासोबत 73, नितीश रेड्डीसोबत 57 धावांची भागीदारी केली. (Photo: BCCI Twitter)