
आयपीएलची सुरुवात चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याने होणार आहे. या सामन्यापूर्वीच चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू कृष्णप्पा गौथमने एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे. कर्नाटकच्या गौथमची पत्नी लवकरच बाळाला जन्म देणार असून त्याने नुकतीच याबद्दल सोशल मीडियाद्वारे माहिती दिली.

के. गौथमने पत्नी अर्चना सुंदरसोबत खास फोटोशूट करत त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. यातील एका फोटोमध्ये दोघेही चेन्नई सुपर किंग्सच्या जर्सीत दिसून येत आहेत.

गौथम आपल्या पत्नीसोबत मागील महिन्यात यूएईला पोहोचला आहे. त्यांचा विलगीकरणातील कालावधी संपला असून गौथम संघासोबत सराव करताना दिसून येत आहे.

के गौथम आयपीएल 2021 मधील सर्वात महागडा अनकॅप्ट खेळाडू ठकरला होता. चेन्नईने त्याला 9.25 कोटींना विकत घेतलं होतं.

चेन्नई सुपर किंग्सने यंदाच्या सीजनमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. आतापर्यंत सात पैकी पाच सामने चेन्नईने जिंकले असून ते गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर विराजमान आहेत.