IND vs SA Test : कुलदीप यादवची मोठी कामगिरी, घरच्या मैदानावर असा कारनामा करणारा नववा खेळाडू

कोलकात्याच्या ईडन गार्डनवर भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. या मालिकेतील दक्षिण अफ्रिकेचा पहिला डाव 159 धावांवर आटोपला. या सामन्यात कुलदीप यादवने 2 विकेट घेतल्या आणि एक विक्रम आपल्या नावावर केला आहे.

| Updated on: Nov 14, 2025 | 3:37 PM
1 / 5
दक्षिण अफ्रिकेने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी घेतली. पण त्यांचा डाव फक्त 159 धावांवरा आटोपला. या डावात कुलदीप यादवने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार बावुमाची विकेट घेऊन आपल्या कारकिर्दीतील एक मोठा टप्पा गाठला. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाला ध्रुव जुरेलच्या हाती झेल देत फक्त तीन धावांवर झेलबाद केले. (Photo- BCCI Twitter)

2 / 5
कर्णधार शुबमन गिलने संघाचं 16 वं षटक कुलदीप यादवच्या हाती सोपवलं. 16व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने कर्णधार टेम्बा बावुमाला बाद केले. यासह कुलदीपने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत एक नवीन टप्पा गाठला. (Photo- BCCI Twitter)

3 / 5
कुलदीप यादवने टेम्बा बावुमाच्या रूपात पहिली विकेट घेतली. ही विकेट कुलदीपसाठी खूप खास ठरली. बावुमाच्या या विकेटसह, कुलदीप यादव भारतातील तिन्ही फॉरमॅटमध्ये 150 विकेट्स घेणारा गोलंदाज बनला. (Photo- BCCI Twitter)

4 / 5
घरच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 150 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेणारा नववा भारतीय खेळाडू ठरला. त्याने 87 डावांमध्ये ही कामगिरी केली. कुलदीप यादव व्यतिरिक्त अनिल कुंबळे, रविचंद्रन अश्विन, हरभजन सिंग, रवींद्र जडेजा, कपिल देव, जवागल श्रीनाथ, झहीर खान आणि मोहम्मद शमी यांनीही ही कामगिरी केली आहे.(Photo- BCCI Twitter)

5 / 5
घरच्या मैदानावर 150 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेणारा भारतीय संघाचा तिसरा डावखुरा गोलंदाज ठरला आहे. कुलदीप यादवच्या आधी रवींद्र जडेजा आणि झहीर खान यांनी ही कामगिरी केली आहे.  (Photo-PTI)