
टीम इंडियाने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना जिंकून मालिकेची सुरुवात विजयाने केली. पहिल्या वनडे सामन्यात भारताने विजयासाठी 349 धावांचं आव्हान दिलं होतं. पण हे आव्हान काही दक्षिण अफ्रिकेला गाठता आलं नाही. भारताने हा सामना 17 धावांनी जिंकला. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

कुलदीप यादवने या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने 4 विकेट घेतल एक विक्रमालाही गवसणी घातली आहे. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न यांचा 23 वर्ष जुना आणि टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलचा विक्रमही मोडला आहे. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

रांचीतील झारखंड क्रिकेट असोसिएशन स्टेडियममवर झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात कुलदीप यादवने 10 षटकं टाकली. यात 68 धावा देत 4 गडी बाद केले. यासह त्याने दक्षिण अफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक वेळा चार विकेट घेण्याचा विक्रम रचला आहे. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सामन्यात कुलदीपने 2018 मध्ये केपटाऊन आणि ग्वाल्हेर, 2022 मध्ये दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात चार बळी घेतले होते. आता रांचीत चार गडी घेत चौथ्यांदा अशी कामगिरी केली. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

दिग्गज गोलंदाज शेन वॉर्न आणि भारतीय लेग-स्पिनर युजवेंद्र चहल यांचा विक्रम कुलदीप यादवने मोडला, शेन वॉर्न आणि युजवेंद्र चहल यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीनवेळा 4 बळी घेतले होते. आता कुलदीपच्या नावावर हा विक्रम झाला आहे. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

कुलदीपने त्याच्या वनडे कारकिर्दीत दहाव्यांदा चार बळी घेतले. त्याने माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळेच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. आता माजी भारतीय वेगवान गोलंदाज अजित आगरकर (12) आणि मोहम्मद शमी (16) कुलदीपच्या पुढे आहेत. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)