छोरियां छोरों से कम हैं क्या?, लागोपाठ 5 बॉलवर 5 विकेट्स, बॅट्समनसहित रेकॉर्ड्सच्या चिंधड्या उडवल्या!
Laura Cardoso : ब्राझीलची कर्णधार रॉबर्टा आवारी. तिने महिला विश्वचषकाच्या पात्रता फेरीत संघाचे शानदार नेतृत्व केले आहे. ब्राझील संघाशी संबंधित अपडेट्सबाबत ती सोशल मीडियावर सतत सक्रिय असते.

T20 विश्वचषक 2021 च्या जल्लोषमय वातावरणात एका महिला गोलंदाजाने क्रिकेटच्या मैदानात धुमाकूळ घातला आहे. या खेळाडूने शेवटच्या षटकात गोलंदाजी केली आणि सलग पाच चेंडूत पाच फलंदाज बाद केले. यादरम्यान तिने हॅट्ट्रिक मिळवत इतिहास रचला. परिणामी, फलंदाजी करणाऱ्या संघाला एका धावेने सामना गमवावा लागला. ब्राझील आणि कॅनडाच्या महिला संघांमधील आयसीसी महिला T20 विश्वचषक स्पर्धेतील पात्रता सामन्यांबद्दल आम्ही तुम्हाला सांगत आहोत. यामध्ये ब्राझीलच्या लॉरा कार्डोसोने षटकातील सहापैकी पाच चेंडूंवर पाच फलंदाज बाद केले. ही ओव्हर कशी होती आणि ही थरारक मॅच कशी झाली?, हे आपण पाहुयात...
- T20 विश्वचषक 2021 च्या जल्लोषमय वातावरणात एका महिला गोलंदाजाने क्रिकेटच्या मैदानात धुमाकूळ घातला आहे. या खेळाडूने शेवटच्या षटकात गोलंदाजी केली आणि सलग पाच चेंडूत पाच फलंदाज बाद केले. यादरम्यान तिने हॅट्ट्रिक मिळवत इतिहास रचला. परिणामी, फलंदाजी करणाऱ्या संघाला एका धावेने सामना गमवावा लागला. ब्राझील आणि कॅनडाच्या महिला संघांमधील आयसीसी महिला T20 विश्वचषक स्पर्धेतील पात्रता सामन्यांबद्दल आम्ही तुम्हाला सांगत आहोत. यामध्ये ब्राझीलच्या लॉरा कार्डोसोने षटकातील सहापैकी पाच चेंडूंवर पाच फलंदाज बाद केले. ही ओव्हर कशी होती आणि ही थरारक मॅच कशी झाली?, हे आपण पाहुयात…
- सामना 20 षटकांचा असला तरी पावसामुळे 17-17 षटकांचा खेळविण्यात आला. यामध्ये ब्राझील महिला क्रिकेट संघाने प्रथम फलंदाजी करताना 7 गडी गमावून 48 धावा केल्या. ब्राझीलकडून कर्णधार रॉबर्टा एव्हरीने सर्वाधिक 21 धावा केल्या. इतर कुणीही दहाच्या आकड्यालाही स्पर्श केला नाही. कॅनडाच्या संघाकडून हिबा शमसादने चार षटकं टाकली आणि आठ धावांत 3 गडी बाद केले. त्याचवेळी अजमतने 11 धावांत 2 गडी बाद केले. ब्राझीलच्या संपूर्ण डावात 2 चौकार लगावले केले, जे कर्णधार रॉबर्टा आवारीनेच मारले. कॅनडाला सामना जिंकण्यासाठी 49 धावांचे लक्ष्य मिळाले होते.
- लक्ष्याचा पाठलाग करताना कॅनडाची अवस्थाही बिकट झाली. कॅनडाच्या बाजूने एकच फलंदाज मुखविंदर गिलला दुहेरी आकडा गाठता आला. गिलने 19 धावा केल्या. कॅनडाने एका क्षणी 19 धावांवर पाच विकेट गमावल्या होत्या. मात्र मुखविंदर गिलने संघाला विजयाच्या समीप नेले. 15 षटकांनंतर कॅनडाची धावसंख्या पाच बाद 46 अशी होती. शेवटच्या षटकात कॅनडाला विजयासाठी फक्त 3 धावा हव्या होत्या आणि त्यांच्या पाच विकेट्स शिल्लक होत्या.
- ब्राझीलकडून लॉरा कार्डोसो शेवटचं षटक टाकण्यासाठी बोलिंग मार्कवर आली. या षटकापूर्वी तिने दोन षटके टाकली होती. यामध्ये एका निर्धाव षटकासह तिने सात धावा दिल्या होत्या. तिला एकही विकेट मिळाली नाही. मुखविंदर गिलने शेवटच्या षटकातील पहिला चेंडू खेळला पण तिला या चेंडूवर एकही धाव मिळाली नाही. दुसऱ्या चेंडूवर धाव घेण्याचा प्रयत्न झाला पण क्रमा कपाडिया धावबाद झाली. तिसऱ्या चेंडूवर हाला अजमत आणि चौथ्या चेंडूवर हिबा शमशाद बाद झाली. पाचव्या चेंडूवर सना जफरने ब्राझीलची कर्णधार रॉबर्टा आवारीचा झेल घेतला. अशा प्रकारे लॉराची हॅट्ट्रिक झाली. तसेच षटकात चार विकेट पडल्या पण एकही धाव झाली नाही. शेवटच्या चेंडूवर मुखविंदर गिलने धाव घेण्याचा प्रयत्न केला पण तीही दुसऱ्या धावण्याच्या प्रयत्नात धावबाद झाली. अशाप्रकारे ब्राझीलने हरलेला सामना जवळपास एका धावेने जिंकला.
- लॉरा कार्डोसोने सामन्यात तीन षटकात एका निर्धाव षटकासह आठ धावा देत तीन बळी घेतले. तिने संघाला एका धावेने रोमहर्षक विजय मिळवून दिला. लॉरा कार्डोसोने सहा सामन्यात 11 विकेट घेतल्या. कॅनडाचे पाच फलंदाज 5 चेंडूत बाद झाले आणि एका षटकात सर्वाधिक विकेट पडण्याचा विक्रम बनला. (फोटोमध्ये लॉरा कार्डोसो)
- ब्राझीलची कर्णधार रॉबर्टा आवारी. तिने महिला विश्वचषकाच्या पात्रता फेरीत संघाचे शानदार नेतृत्व केले आहे. ब्राझील संघाशी संबंधित अपडेट्सबाबत ती सोशल मीडियावर सतत सक्रिय असते.






