
आयपीएलच्या मागच्या पर्वापूर्वी झालेल्या मेगा लिलावात सर्वाधिक बोली लावून लखनौ सुपर जायंट्सने लक्ष वेधून घेतलं होतं. ऋषभ पंतसाठी सर्वाधिक बोली लावली होती. तसेच मुंबई इंडियन्स संघातून झहीर खानला घेत त्याच्यावर विश्वास टाकला होता. मात्र अपेक्षेप्रमाणे कामगिरी झाली नाही. निराशाजनक कामगिरीनंतर मालक संजीव गोएंका पुढील हंगामासाठी नवीन रणनीती तयार करण्यात व्यस्त आहेत. (फोटो- पीटीआय)

अनुभवी खेळाडू झहीर खानने आयपीएल संघ लखनौ सुपर जायंट्सशी आपले संबंध तोडले आहेत. मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर आणि संघाचे मालक संजीव गोयंका यांच्याशी असलेल्या मतभेदामुळे त्यांनी संघ सोडला अशी चर्चा आता क्रीडाप्रेमी करत आहेत. (फोटो- पीटीआय)

ऑगस्ट 2024 मध्ये झहीर लखनौ सुपर जायंट्समध्ये सामील झाला होता. आयपीएल 2023 नंतर झहीर खानने गौतम गंभीरची जागा घेतली . गंभीरने आयपीएल 2024 साठी कोलकाता नाईट रायडर्ससाठी मार्गदर्शक म्हणून काम केले होते. त्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक बनला. (फोटो- पीटीआय)

झहीर खानने लखनौ सुपर जायंट्ससोबत दोन वर्षांचा करार केला होता. पण त्याचा करार एका वर्षातच संपला. झहीर 2018 ते 2022 पर्यंत मुंबई इंडियन्स फ्रँचायझीशी संबंधित होता, प्रथम त्याने संघाचे क्रिकेट संचालक आणि नंतर जागतिक विकास प्रमुख म्हणून काम पाहिले. (फोटो- पीटीआय)

झहीर खान तीन आयपीएल संघांकडून खेळला आहे. एमआय, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स या संघांकडून खेळला आहे. त्याने दहा हंगामात तिन्ही संघांसाठी 100 सामने खेळले. 7.58 च्या इकॉनॉमीने 102 विकेट्स घेतल्या. झहीर खान शेवटचा आयपीएल सामना 2017 मध्ये खेळला होता. (फोटो- पीटीआय)