
आयपीएल 2026 स्पर्धेचे एकूण 18 पर्व पार पडली आहेत. आता 19व्या पर्वासाठी दहाही संघ सज्ज आहेत. असं असताना या स्पर्धेत भाग घेतलेल्या दहापैकी एक फ्रेंचायझी अंतिम फेरी गाठण्यापासून वंचित आहे. हा संघ दुसरा तिसरा कोणीही नसून लखनौ सुपर जायंट्स आहे. लीगच्या सुरूवातीपासून या संघाने चांगली कामगिरी केली आहे. पण प्लेऑफच्या पुढे काही निघू शकला नाही. (Photo_BCCI/IPL)

आयपीएल स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सची 2022 मध्ये एन्ट्री झाली होती. पहिल्या पर्वापासून संघ चांगली कामगिरी करत आहे. संघात अनेक स्टार खेळाडू आहेत. साखळी फेरीत या संघाची कामगिरी चांगली राहिली आहे. पण त्यानंतर संघाची कामगिरी सुमार ठरली आहे. (Photo_BCCI/IPL)

लखनौ सुपर जायंट्सने 2022 आणि 2023 स्पर्धेच्या प्लेऑफ फेरीत जागा मिळवली होती. पण दोन्ही वेळेस एलिमिनेटर सामन्यातून आऊट व्हावं लागलं. एकदा आरसीबीने आणि एकदा मुंबई इंडियन्सने पराभूत करत स्पर्धेतून बाहेर काढलं. (Photo_BCCI/IPL)

आयपीएल 2024 आणि 2025 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सची कामगिरी सुमार राहिली. त्यामुळे प्लेऑफमध्ये जागाच मिळवू शकला नाही. 2024 च्या पर्वात नेट रनरेटचं गणित चुकलं आणि पुढच्या टप्प्याला मुकला. तर 2025 मध्ये साखळी फेरीतच आव्हान संपुष्टात आलं. (Photo_BCCI/IPL)

आयपीएल 2026 स्पर्धेसाठी ऋषभ पंतच्या नेतृत्वात संघ पुन्हा एकदा जोमाने कामाला लागला आहे. आता यंदा संघ कशी कामगिरी करतो, याकडे लक्ष लागून आहे. यंदा साखळी फेरीत आव्हान संपुष्टात येतं की प्लेऑफमध्ये जागा मिळवतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. (Photo_BCCI/IPL)