Mbappe Vs Messi: बाद फेरीचा राजा किलियन एम्बाप्पे! गोल्डन बूटसाठी लियोनल मेस्सीसमोर मोठं आव्हान
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत गोल्डन बूटची शर्यत चुरशीची आहे. या शर्यतीत लियोनल मेस्सी आणि किलियन एम्बाप्पे शर्यतीत आहेत. इतकंच काय तर वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक गोलच्या रेसमध्येही त्याच्या मागोमाग आहे.

फ्रान्सचा किलियन एम्बाप्पे फिफा वर्ल्डकप स्पर्धेत लियोनल मेस्सीसाठी आव्हान ठरत आहे. किलियन एम्बाप्पेची बाद फेरीतील कामगिरी पाहून याचा अंदाज येईल. एम्बाप्पेचं हा तिसरा वर्ल्डकप आहे. तसेच बाद फेरीत आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. (Photo: Getty Images)

एम्बाप्पेने आपल्या फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यतं 20 सामने खेळले आहेत. त्यात त्याने 20 गोल मारले आहेत. या 20 गोलमध्ये 12 गोल हे त्याने 11 बाद फेरीच्या सामन्यात मारले आहेत. (Photo: Getty Images)

फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या मागच्या 60 वर्षात एम्बाप्पे हा पहिला फुटबॉलपटू ठरला आहे. त्याने दोन वेगवेगळ्या स्पर्धेत 8 गोल मारले आहेत. तसेच दोनहून अधिक गोलसाठी असिस्ट केलं आहे. (Photo: Getty Images)

लियोनल मेस्सीने फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या कारकिर्दीत आतापर्यंत 21 गोल मारले आहेत. तर एम्बाप्पेच्या नावावर 20 गोल आहेत. त्यामुळे मेस्सीचा हा विक्रम फार काळ टिकेल असं वाटत नाही. (Photo: Getty Images)

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत गोल्डन बूटची शर्यत चुरशीची आहे. एम्बाप्पेचं मेस्सीला कडवं आव्हान आहे. कारण दोघांनी या स्पर्धेत प्रत्येकी 8-8 गोल मारले आहेत. (Photo: Getty Images)