LSG vs MI : रोहित शर्माकडे महारेकॉर्डची संधी, ठरणार एकमेव भारतीय, लखनौ विरुद्ध इतिहास घडवणार?

Rohit Sharma LSG vs MI IPL 2025 : मुंबई इंडियन्स आयपीएल 2025 मधील आपला आठवा सामना हा 27 एप्रिलला लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध खेळणार आहे. रोहित शर्माकडे या सामन्यात इतिहास घडवण्याची संधी आहे.

| Updated on: Apr 26, 2025 | 5:49 PM
1 / 6
मुंबई इंडियन्सचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मा याला 18 व्या मोसमात अपेक्षित सुरुवात करता आली नाही. रोहितने काही सामन्यात अपयशी ठरल्यानंतर जोरदार कमबॅक केलं. रोहितने आतापर्यंत 8 सामन्यांमध्ये 32.57 च्या सरासरीने आणि 154.05 च्या स्ट्राईक रेटने 228 धावा केल्या आहेत. या ममधअये 2 अर्धशतकांचा समावेश आहे. (Photo Credit : Ipl/Bcci)

2 / 6
रोहितने चेन्नई सुपर किंग्सनंतर सनरायजर्स हैदराबाद विरुद्धही अर्धशतक झळकावलं. रोहितने या दोन्ही सामन्यात मुंबईच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. मुंबईसमोर आता पुढील सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचं आव्हान आहे. रोहितकडे या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी आहे. (Photo Credit : Ipl/Bcci)

3 / 6
रोहितला आयपीएलमध्ये षटकारांचा त्रिशतक करण्यासाठी 5 षटकारांची गरज आहे. रोहितने या स्पर्धेच्या इतिहासात एकूण 295 सिक्स लावले आहेत. त्यामुळे रोहित लखनौ विरुद्ध षटकारांचं त्रिशतक पूर्ण करतो का? याकडे पलटणच्या चाहत्यांचं लक्ष लागून आहे. (Photo Credit : Ipl/Bcci)

4 / 6
आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकारांचा विक्रम हा ख्रिस गेल याच्या नावावर आहे. गेलने एकूण 357 सिक्स ठोकले आहेत. तर रोहितकडे 300 षटकार लगावणारा पहिला भारतीय, असा बहुमान मिळवण्याची संधी आहे. (Photo Credit : Ipl/Bcci)

5 / 6
तसेच रोहित शर्मा याच्या नावावर मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक सिक्स लगावण्याचा विक्रम आहे. रोहितने मुंबईकडून आतापर्यंत 261 षटकार लगावले आहेत. तसेच रोहितने त्याआधी डेक्कन चार्जर्स टीमसाठी 34 सिक्स लगावले होते.(Photo Credit : Ipl/Bcci)

6 / 6
दरम्यान रोहितने 18 व्या मोसमातील 8 सामन्यांमधील 2 डावांमध्ये 15 षटकार लगावले आहेत. रोहित यासह सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत संयुक्तरित्या नवव्या स्थानी आहे. (Photo Credit : Ipl/Bcci)