AUS vs ENG : मिचेल स्टार्क बॉक्सिंग डे कसोटीत इतिहास रचणार, असं केलं की झालं…

एशेज कसोटी मालिकेतील चौथा सामना अर्थात बॉक्सिंग डे कसोटी 26 डिसेंबरपासून खेळला जाणार आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर हा सामना खेळला जाईल. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याच्याकडे विक्रम रचण्याची संधी आहे.

| Updated on: Dec 25, 2025 | 7:27 PM
1 / 5
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या एशेज कसोटी मालिकेतील तीन सामने पार पडले आहे. या तिन्ही सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आहे. उर्वरित दोन्ही सामन्यात ऑस्ट्रेलियाचं पारडं जड दिसत आहे. चौथा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून होत असून या सामन्यात मिचेल स्टार्ककडे विक्रम रचण्याची संधी आहे. (Photo- PTI)

2 / 5
एशेज कसोटी मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांमध्ये मिचेल स्टार्कने 17.05 च्या सरासरीने 22 बळी घेतले आहेत. बॉक्सिंग डे कसोटीत स्टार्ककडे आता श्रीलंकेचा माजी खेळाडू रंगना हेराथला मागे टाकण्याची मोठी संधी आहे.  (फोटो-Gareth Copley/Getty Images)

3 / 5
मिचेल स्टार्क सध्या कसोटी क्रिकेटमध्ये डावखुरा गोलंदाज म्हणून सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम 424 विकेट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. रंगना हेराथ 433 विकेट्स घेऊन या यादीत अव्वल स्थानावर आहे. जर स्टार्कने बॉक्सिंग डे कसोटीत 10 विकेट्स घेतल्या तर तो हेराथला मागे टाकून अव्वल स्थान मिळवेल. (Photo: PTI)

4 / 5
मिचेल स्टार्क सध्या कसोटी सामन्यात सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत आठव्या स्थानावर आहे. जर स्टार्कने बॉक्सिंग डे कसोटीत आठ बळी घेतले तर तो न्यूझीलंडचा माजी खेळाडू आणि महान वेगवान गोलंदाज रिचर्ड हॅडलीला मागे टाकून सातव्या स्थानावर पोहोचू शकतो.  (Photo Credit : Getty Images)

5 / 5
बॉक्सिंग डे टेस्टमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज म्हणून स्टार्ककडे पुन्हा नंबर वन स्थान मिळवण्याची उत्तम संधी आहे. स्टार्क सध्या 213  विकेट्ससह यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर पॅट कमिन्स 221 विकेट्ससह आणि नाथन लायन 224 विकेट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे.  (Photo Credit : Getty Images)