मिचेल स्टार्ककडून 35 वर्षे जुन्या इतिहासाची पुनरावृत्ती, एकाच सामन्यात केला असा विक्रम

एशेज मालिका 2025-2026 स्पर्धेतील पहिलाच सामना रंगतदार वळणावर आला आहे. मिचेल स्टार्कने इंग्लंडच्या फलंदाजांना सळो की पळो करून सोडलं आहे. पहिल्या डावात आघाडी घेतली होती. मात्र तरीही ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवशीच खेळ खल्लास केला.

| Updated on: Nov 22, 2025 | 3:51 PM
1 / 5
एशेज 2025-2026 मालिकेतील पहिल्याच सामन्यात  ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने भेदक गोलंदाजी केली. मिचेल स्टार्क दोन्ही डावात इंग्लंडच्या गोलंदाजांवर भारी पडला. या सामन्यात मिचेल स्टार्कने 35 वर्षे जुन्या विक्रमाची पुनरावृत्ती केली.  (PHOTO CREDIT- PTI)

2 / 5
मिचेल स्टार्कने पहिल्या डावात 12.5 षटकात 58 धावा देत 7 विकेट घेतल्या. हा त्याचा कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम स्पेल होता. यापूर्वी त्याने कधीच एका डावात 7 विकेट घेतल्या नव्हत्या. मिचेल स्टार्कने दुसऱ्या डावातही प्रभावी गोलंदाजी केली.  (PHOTO CREDIT- PTI)

3 / 5
मिचेल स्टार्कने दुसऱ्या डावातही ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करून दिली. पहिल्याच षटकात विकेट घेतली. तसेच एकूण 3 जणांना तंबूचा रस्ता दाखवला. यासह संपूर्ण सामन्यातील दोन्ही डावात मिळून 10 विकेट घेतल्या. मिचेल स्टार्कने तिसऱ्यांदा एका सामन्यात 10 विकेट घेण्याची किमया साधली आहे.  (PHOTO CREDIT- PTI)

4 / 5
मिचेल स्टार्क मागच्या 35 वर्षात एशेज कसोटी मालिकेत 10 विकेट घेणारा पहिला ऑस्ट्रेलियन गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी 1990/91 मध्ये क्रेग मॅकडरमॉटने 11 विकेट घेतल्या होत्या. मात्र त्यानंतर कोणत्याही ऑस्ट्रेलियान वेगवान गोलंदाजाला अशी कामगिरी करता आली नाही.  (PHOTO CREDIT- PTI)

5 / 5
मिचेल स्टार्कने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप इतिहासात 200 विकेटचा टप्पाही पूर्ण केला आहे. मिचेल स्टार्क हा टप्पा गाठणारा तिसरा गोलंदाज आहे. यापूर्वी नाथन लायन आणि पॅट कमिन्स यांनी ही कामगिरी केली आहे. नाथन लायनने 219 विकेट घेत या यादीत आघाडीवर आहे.  (PHOTO CREDIT- PTI)