PAK NZ T20 : न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी पाकिस्तान संघात पुन्हा उलथापालथ, मोहम्मद रिझवानच्या खांद्यावर नवी जबाबदारी

| Updated on: Jan 08, 2024 | 4:23 PM

पाकिस्तानचं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात नाक कापलं गेलं. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत व्हाईट वॉश मिळाल. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला त्यांच्या मायभूमीत पराभूत करण्याचं स्वप्नही भंगलं आहे. आता पाकिस्तानचा संघ न्यूझीलंड दौऱ्यासाठी सज्ज झाला आहे. या दौऱ्यात पाच सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. यासाठी रिझवानच्या खांद्यावर नवी धुरा देण्यात आली आहे.

1 / 6
पाकिस्तानचा सघ पाच सामन्यांची टी20 मालिका न्यूझीलंडसोबत खेळणार आहे. टी20 वर्ल्डकपच्या दृष्टीने ही मालिका खूपच महत्त्वाची आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील नामुष्कीनंतर पाकिस्तान संघात बरीच उलथापालथ झाली आहे. शाहीन आफ्रिदीकडे टी20 ची धुरा सोपण्यात आली आहे. आता त्याला रिझवानची साथ मिळणार आहे.

2 / 6
शाहीन आफ्रिदीच्या नेतृत्वात पाकिस्तान संघ पहिल्यांदाच न्यूझीलंड दौऱ्यात खेळणार आहे. 12 जानेवारीपासून टी20 मालिका सुरु होणार आहे. त्यानंतर 14 जानेवारी, 17 जानेवारी, 19 जानेवारीला सामना होईल. या मालिकेचा शेवटचा सामना 21 जानेवारीला होणार आहे.

3 / 6
न्यूझीलंड मालिकेपूर्वी मोहम्मद रिझवानला टी20 संघाचा उपकर्णधार नियुक्त केलं आहे. त्याच्या कामगिरीचा टीमला फायदा होईल, असं निवड समितीचं म्हणणं आहे.

4 / 6
मोहम्मद रिझवानने पाकिस्तानसाठी आतापर्यंत 85 सामन्यांच्या 73 डावांमध्ये 49.07 च्या उत्कृष्ट सरासरीने 2797 धावा केल्या आहेत.

5 / 6
टी20 फॉरमॅटमध्ये मोहम्मद रिझवानने आतापर्यंत एक शतक आणि 25 अर्धशतके झळकावली आहेत. नाबाद 104 ही त्याची सर्वोत्तम खेळी राहिली आहे.

6 / 6
मोहम्मद रिझवानने विकेटकीपर म्हणून 43 झेल पकडले आहेत. तर 11 खेळाडूंना यष्टीचीत केलं आहे. टी20 वर्ल्डकप 2024 दृष्टीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हे पाऊल उचललं असल्याचं बोललं जात आहे.