IND vs ENG : ओव्हल कसोटी सामन्यात मोहम्मद सिराजचं द्विशतक, झालं असं की…

ओव्हल कसोटी सामन्यात भारताने पहिल्या डावात 224 धावांचा पाठलाग केला. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 247 धावांवर आटोपला. इंग्लंडकडे 23 धावांची आघाडी आहे. असं असताना मोहम्मद सिराजने मात्र वेगळ्याच विक्रमाला गवसणी घातली आहे.

| Updated on: Aug 01, 2025 | 10:32 PM
1 / 6
ओव्हल कसोटी सामन्यातील पहिल्या डावात इंग्लंडचा संघ 247 धावांवर सर्वबाद झाले. पहिल्या डावात इंग्लंडकडे 23 धावांची आघाडी आहे. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी अशी स्थिती असल्याने सामन्याचा निकाल लागणार हे स्पष्ट झालं आहे. (Photo- BCCI Twitter)

2 / 6
पहिल्या डावात मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांची भेदक गोलंदाजीपुढे इंग्लंडने नांगी टाकली. खरं तर 92 धावांपर्यंत एकही विकेट नव्हती. तर 175 धावांपर्यंत 4 विकेट अशी स्थिती होती. पण 235 धावांवर संपूर्ण संघ तंबूत परतला. (Photo- BCCI Twitter)

3 / 6
मोहम्मद सिराजने या सामन्यात 16.2 षटकं टाकली. यात एक षटक निर्धाव टाकलं आणि 86 धावा देत 4 गडी बाद केले. मोहम्मद सिराजने ओली पोपची विकेट काढली आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक विशेष टप्पा गाठला. (Photo- BCCI Twitter)

4 / 6
इंग्लंडचा कर्णधार ऑली पोपला बाद करून मोहम्मद सिराजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 200 विकेट्स पूर्ण केल्या. सिराजने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये 115, एकदिवसीय सामन्यात 71 आणि टी20  मध्ये 14 विकेट्स घेतल्या आहेत. (Photo- BCCI Twitter)

5 / 6
2017 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजने आतापर्यंत एकूण 101 सामने खेळले आहेत. यात त्याने 29.12 च्या सरासरीने 200 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. सिराजने आतापर्यंतच्या कारकिर्दीत पाच वेळा पाच विकेट्स घेण्यास यश मिळवले आहे. (Photo- BCCI Twitter)

6 / 6
मोहम्मद सिराज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 200 पेक्षा जास्त विकेट्स घेणारा भारतीय क्रिकेटमधील 14 वा वेगवान गोलंदाज बनला आहे. तसेच सिराज आता या मालिकेत 18 विकेट्ससह सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. (Photo- BCCI Twitter)