Womens T20i World Cup : वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय महिला गोलंदाज, नंबर 1 कोण?

Most Wickets For Team India In Icc T20i Womens world Cup : आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या दहाव्या पर्वात टीम इंडिया सेमी फायनलच्या शर्यतीत आहे. या पर्वात भारताने 4 पैकी 3 सामने जिंकले आहेत. या निमित्ताने महिला टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियासाठी सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांबाबत जाणून घेऊयात.

| Updated on: Jun 26, 2026 | 9:21 PM
1 / 5
दीप्ती शर्मा ही वुमन्स टीम इंडियाची अनुभवी ऑलराउंडर आहे. दीप्तीने टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध झालेल्या सामन्यात 5 विकेट्स मिळवल्या. मात्र त्यानंतरही दीप्ती शर्मा भारतासाठी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारी गोलंदाज नाही. (Photo Credit : AP)

2 / 5
वुमन्स टीम इंडियासाठी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक विकेट्सचा विक्रम हा पूनम यादव हीच्या नावावर आहे. पूनमने टी 20i वर्ल्ड कपमधील 18 सामन्यांमध्ये 28 विकेट्स मिळवल्या आहेत. (Photo Credit : AFP)

3 / 5
टीम इंडियाची ऑलराउंडर दीप्ती शर्मा या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. दीप्तीने आतापर्यंत टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील 23 सामन्यांमध्ये 25 विकेट्स मिळवल्या आहेत. दीप्तीला भारताकडून टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे. त्यासाठी दीप्तीला आणखी 4 विकेट्स घेण्याची गरज आहे. (Photo Credit : AP)

4 / 5
राधा यादव हीने भारतासाठी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील 14 सामन्यांमध्ये 21 विकेट्स मिळवल्या आहेत. राधाने वर्ल्ड कपमध्ये एका सामन्यात 4 विकेट्स मिळवल्या आहेत. (Photo Credit : PTI)

5 / 5
टीम इंडियासाठी रेणुका सिंग हीने टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील 10 सामन्यांमध्ये 15 विकेट्स मिळवल्या आहेत. रेणूकाने या दरम्यान 1 वेळा 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. (Photo Credit : AP)

Follow Us