
आयपीएल 2025 स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. दोन सामन्यानंतर जेतेपदाचा निकाल लागणार आहे. आरसीबीने अंतिम फेरीत जागा पक्की केली आहे. तर 1 जून रोजी पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्या लढतीतील दुसऱ्या संघाचा फैसला होणार आहे. (फोटो- पीटीआय)

आरसीबीने पंजाब किंग्सला क्वॉलिफायर 1 फेरीत पराभूत केलं होतं. तर मुंबई इंडियन्सने एलिमिनेटर फेरीत गुजरात टायटन्सला पराभूत करून क्वॉलिफायर 2 मध्ये जागा मिळवली आहे. क्वॉलिफायर 2 मध्ये मुंबई इंडियन्सचा आकडा चांगला आहे आणि आरसीबीचं टेन्शन वाढवू शकतं. (फोटो- पीटीआय)

आयपीएलमध्ये 2011 पासून प्लेऑफ सामन्यांची सुरुवात झाली होती. तेव्हापासून मुंबई इंडियन्सने चार वेळा क्वॉलिफायर 2 सामना खेळला आहे. यावेळी 2 सामने जिंकले, ते सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. पण जेव्हा मुंबई इंडियन्सने क्वॉलिफायर 2 सामना जिंकला, तेव्हा जेतेपद मिळवलं आहे. (फोटो- पीटीआय)

मुंबई इंडियन्सने 2013 मध्ये क्वालिफायर 2 मध्ये राजस्थान संघाचा पराभव केला होता. त्यानंतर अंतिम सामन्यात सीएसकेचा पराभव करून त्यांनी विजेतेपद पटकावले. 2017 मध्येही त्यांनी क्वालिफायर 2 जिंकला होता आणि नंतर अंतिम सामन्यात रायझिंग पुणे सुपरजायंटचा पराभव केला होता. (फोटो- पीटीआय)

क्वालिफायर 2 मध्ये पंजाब किंग्सला हरवणे मुंबई इंडियन्ससाठी वाटते तितकं सोपे असणार नाही. आयपीएलमध्ये दोन्ही संघांमध्ये एकूण 33 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी मुंबईने 17 सामने जिंकण्यात यश मिळवले आहे. तर 16 सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. यंदाच्या साखळी फेरीतही पंजाब किंग्सने मुंबईचा धुव्वा उडवला आहे. (फोटो- पीटीआय)