SMAT 2025 : यशस्वी जैस्वाल याचा दिलदारपणा, 50-50 फॉर्म्युल्याने मनं जिंकली, सर्फराज खानसोबत काय केलं?

Yashasvi Jaiswal-Sarfaraz Khan: मुंबईने शार्दूल ठाकुर याच्या नेतृत्वात हरयाणाचा पराभव केला. यशस्वी जैस्वाल आणि सर्फराज खान या जोडीने सामन्यात विजयी धावांचा पाठलाग करताना निर्णायक भूमिका बजावली. यशस्वीला त्याच्या या कामगिरीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. त्यानंतर यशस्वीने एका निर्णयाने चाहत्यांची मनं जिंकली.

| Updated on: Dec 14, 2025 | 9:29 PM
1 / 5
मुंबई क्रिकेट टीमने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 स्पर्धेत सुपर लीग सामन्यात हरयाणावर 4 विकेट्सने विजय मिळवला. यशस्वी जैस्वाल आणि सर्फराज खान ही जोडी मुंबईच्या विजयाची हिरो ठरली. (Photo Credit: Twitter/Jio Hotstar)

2 / 5
हरयाणाने मुंबईसमोर 235 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मुंबईने हे आव्हान 15 बॉलआधी 6 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. मुंबईने 17.3 ओव्हरमध्ये हे आव्हान पूर्ण केलं. तसेच मुंबई या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करणारी दुसरी टीम ठरली. (Photo Credit: Twitter/Jio Hotstar)

3 / 5
यशस्वी जैस्वाल याने विजयी धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक आणि शतकी खेळी केली. यशस्वीला त्याच्या खेळीसाठी मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं. यशस्वीने यावेळेस दिलदारपणा दाखवला. यशस्वीने अर्धशतक करणाऱ्या सर्फराज खान याच्यासह ही ट्रॉफी शेअर केली. (Photo Credit: Twitter/Jio Hotstar)

4 / 5
मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराची बक्षिस रक्कम ही 50 हजार रुपये इतकी आहे. यशस्वीने सर्फराजसह ट्रॉफीसह ही रक्कमही शेअर केली. सर्फराजने या सामन्यात 64 धावा केल्या. (Photo Credit: Twitter/Jio Hotstar)

5 / 5
मुंबईला याआधीच्या सामन्यात हैदराबादकडून पराभूत व्हावं लागलं होतं. मोहम्मद सिराज हा हैदराबादच्या विजयाचा हिरो ठरलेला. सिराजने तेव्हा तन्मय अग्रवाल याच्यासह मॅन ऑफ द मॅच पुरस्कार आणि बक्षिस रक्कम शेअर केली होती. (Photo Credit: Twitter/Jio Hotstar)