
टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली याला 15 फेब्रुवारी रोजी पुत्ररत्नाचा लाभ झाला. अनुष्काने दुसऱ्या अपत्याला जन्म दिला. वामिकाला मोठा भाऊ मिळाला. विराटने 5 दिवसानंतर आपल्याला मुलगा झाल्याची बातमी दिली. आपल्या मुलाचं नावं अकाय ठेवल्याचं विराटने सांगितलं. विराटनंतर आता आणखी एक क्रिकेटर बापमाणूस झाला आहे.

न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज केन विलियमसन हा तिसऱ्यांदा बाबा झाला आहे. केन आणि त्याची पत्नी सारा रहीम या दोघांना कन्यारत्नाचा लाभ झाला आहे. विशेष बाब म्हणजे केन आणि सारा या दोघांनी अजून लग्न केलेलं नाही. या दोघांची लव्ह स्टोरी फार इंटरेस्टिंग आहे.

सारा आणि केन 5 वर्ष रिलेशनमध्ये राहिले. त्यानंतर दोघांना पहिल्यांदा 2020 मध्ये कन्यारत्न प्राप्त झालं. त्यानंतर दोघांना 2022 मध्ये पुत्ररत्नाची प्राप्ती झाली.

केन आता तिसऱ्यांदा बाबा झाला आहे. साराचं हे एकूण तिसरं अपत्य आहे. आपल्याला दुसऱ्यांदा मुलगी झाल्याची गोड बातमी केनने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करत दिली आहे. "गोड मुलीचा या जगात स्वागत आहे. तुझ्या सुरक्षित आगमनासाठी आणि भविष्यातील वाटचालीसाठी आभारी आहे", असं केनने या पोस्टमध्ये म्हटलंय

केनने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी 20 मालिकेतून विश्रांती घेतली. अशा महत्त्वपूर्ण क्षणी केनला आपल्या कुटुंबासोबत राहायचं होतं. केन दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर पितृत्व रजेवर होता.

आता केन ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेतून कमबॅक करु शकतो. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 साखळीचा भाग आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा मालिका निर्णयाक अशी आहे.