टीम इंडियाच्या 13 सामन्यात खेळले 9 नवे खेळाडू; मागच्या 50 दिवसात काय घडलं? जाणून घ्या

भारताचे आंतरराष्ट्रीय दौरे सुरू आहेत. असं असताना मागच्या दीड महिने भारतीय संघासाठी चढउताराचे ठरले. पण या कालावधीतील 13 सामन्यात 9 खेळाडूंचं पदार्पण झालं. चला जाणून घेऊयात कोणत्या फॉर्मेटमध्ये कोण खेळलं ते..

| Updated on: Jul 26, 2026 | 3:35 PM
1 / 5
टीम इंडियात मागच्या दीड महिन्यात बरंच काही घडलं आहे. असं असताना एक दोन नाही तर तब्बल 9 खेळाडूंनी टीम इंडियात पदार्पण केलं. मागच्या 50 दिवसात म्हणजेच 6 जून 2026 ते 25 जुलै 2026 दरम्यान तीन फॉर्मेटमध्ये एकूण 9 खेळाडूंनी डेब्यू केलं. या दरम्यान एकूण 13 सामने खेळले गेले. यात एक कसोटी आणि तीन वनडे सामन्यांचा समावेश आहे. (Photo: PTI)

2 / 5
भारतीय कसोटी संघात एकमेव डेब्यू झाला. मानव सुथारला अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळाली.  त्यामुळे त्याचा कसोटी संघातील प्रवास सुरू झाला आहे. आता श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात संधी मिळते का नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. (Photo: PTI)

3 / 5
वनडे फॉर्मेटमध्ये तीन खेळाडूंचं पदार्पण झालं. यात हर्ष दुबे, गुरनूर ब्रार आणि प्रिन्स यादव यांचा समावेश आहे. या तिन्ही खेळाडूंनी अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेत पदार्पण केलं. हर्ष आणि गुरनूर ब्रार यांनी धर्मशाळेत वनडे पदार्पण केलं होतं. तर प्रिन्स यादवने लखनौमध्ये खेळलेल्या दुसऱ्या  वनडे सामन्यात पदार्पण केलं. (Photo: PTI)

4 / 5
भारताने मागच्या 50 दिवसात नऊ टी20 सामने खेळले. त्यात एकूण 5 खेळाडूंनी पदार्पण केलं. युके दौऱ्यात भारताने एकूण 7 टी20 सामने खेळले आणि तीन खेळाडूंनी डेब्यू केला. यात प्रिन्स यादव, सूर्यांश शेडगेने आयर्लंडविरुद्ध पदार्पण केलं. तर वैभव सूर्यवंशीने इंग्लंडिविरुद्ध मॅनचेस्टरमध्ये पदार्पण केलं होतं. (Photo: PTI)

5 / 5
भारताचा झिम्बाब्वे दौरा सुरू आहे. या दौऱ्यात दोन खेळाडूंनी पदार्पण केलं. आतापर्यंत खेळलेल्या दोन सामन्यात हे पदार्पण पाहायला मिळालं. पहिल्या टी20 सामन्यात अशोक शर्मा, तर दुसऱ्या टी20 सामन्यात यश ठाकुरने पदार्पण केलं. (Photo: PTI)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us