IPL 2026 स्पर्धेपूर्वी सनरायझर्स हैदराबाद संघाला रामराम! नितीश कुमार रेड्डीने अखेर मौन सोडलं, म्हणाला…

आयपीएल स्पर्धेत गेल्या तीन वर्षांपासून नितीश कुमार रेड्डी सनरायझर्स हैदराबादकडून खेळत आहे. आतापर्यंत त्याने 28 सामने खेळले आहे. मात्र आगामी स्पर्धेत नव्या संघासोबत दिसेल, अशी चर्चा रंगली आहे. पण या सर्व चर्चांवर नितीश कुमार रेड्डीने पडदा टाकला असून स्पष्टीकरण दिलं आहे.

| Updated on: Jul 29, 2025 | 3:32 PM
1 / 5
आयपीएल 2026 अर्थात 19व्या पर्वासाठी फ्रेंचायझींची रणनिती सुरु झाली आहे. सात महिन्यांदा अवधी शिल्लक असून ट्रेड विंडो आणि मिनी लिलावाकडे लक्ष लागून आहे. असं असताना नितीश कुमार रेड्डी सनरायझर्स हैदराबादची साथ सोडणार अशा बातम्या सोशल मीडियावर येत आहेत.(फोटो- Nitish Kumar Reddy/ Instagram)

2 / 5
सोशल मीडियावरील या बातम्या आणि चर्चांना नितीश कुमार रेड्डीने पूर्णविराम लावला आहे. नितीश कुमार रेड्डी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला की, 'सनराइजर्स हैदराबादसोबत माझे नाते विश्वास, आदर आणि वर्षानुवर्षे असलेल्या उत्कटतेवर बांधले गेले आहे. म्हणूनच मी नेहमीच एसआरएच संघासोबत असेन.' (फोटो- पीटीआय)

3 / 5
'मी सनरायझर्स हैदराबाद संघ सोडणार आहे ही फक्त अफवा आहे. मला नेहमीच एसआरएच संघाचा भाग व्हायचे होते. मी या संघासोबतच राहीन.' असे नितीश कुमार रेड्डी यांनी स्पष्ट केले आहे. येत्या हंगामातही नितीश कुमार रेड्डी हा एसआरएच संघात दिसणार आहे. (फोटो- नितीशकुमार रेड्डी ट्वीटर)

4 / 5
नितीश कुमार रेड्डी याने 2023 मध्ये आयपीएल कारकिर्दीला सुरुवात केली. सनरायझर्स हैदराबाद संघात निवड होऊन पदार्पण करणारा तरुण अष्टपैलू खेळाडू ठरला. गेल्या तीन हंगामांपासून एसआरएच संघाचा भाग आहे. गेल्या दोन हंगामांपासून तो सनरायझर्स हैदराबादच्या प्लेइंग इलेव्हनचा कायमचा सदस्य आहे.(फोटो- टीव्ही 9 नेटवर्क कन्नड)

5 / 5
सनरायझर्स हैदराबादकडून आतापर्यंत 28 सामने खेळलेल्या नितीश कुमार रेड्डी यांनी एकूण 485 धावा केल्या आहेत. या काळात त्यांनी २ अर्धशतके झळकावली आहेत. त्यांनी 139 चेंडू टाकले आहेत आणि एकूण 5 विकेट्स घेतल्या आहेत. (फोटो- टीव्ही 9 नेटवर्क कन्नड)