SL vs SA : कुसल मेंडिस याने जयसूर्याचा मोठा विक्रम मोडला, सामन्यात चौकार आणि षटकारांचा वर्षाव

SL vs SA : दक्षिण आफ्रिकेने धावांचं डोंगर रचला असताना श्रीलंकेने हार मानली नाही. अगदी शेवटच्या विकेटपर्यंत झुंज दिली आहे. त्यामुळे 300 पार धावा करण्यात यश आलं. दुसरीकडे, कर्णधार कुसल मेंडिस याने वादळी खेळी केली.

| Updated on: Oct 07, 2023 | 10:29 PM
1 / 6
कुसल मेंडिस याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 25 चेंडूत अर्धशतक झळकावलं. तसेच 42 चेंडूत 76 धावा करून बाद झाला. त्याच्या आक्रमक खेळीमुळे क्रीडाप्रेमींना मेजवानी मिळाली.

2 / 6
कुसल मेंडिस याने 8 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 42 चेंडूत 76 धावा केल्या. 8 षटकारांसह त्याने सनथ जयसूर्याचा विक्रम मोडीत काढला आहे.

3 / 6
श्रीलंकेकडून एका डावात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम सनथ जयसूर्याच्या नावावर होता. त्याने 2007 मध्ये पोर्ट ऑफ स्पेनमध्ये बांगलादेश विरुद्ध 7 षटकार मारले होते.

4 / 6
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत कुसल मेंडिस याने 25 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. वर्ल्डकपमध्ये श्रीलंकेकडून हे तिसरं वेगवान अर्धशतक आहे. श्रीलंकेकडून सर्वात वेगवान अर्धशतक एंजेला मॅथ्यूज याने 2015 मध्ये मारलं होतं. यासाठी त्याने 20 चेंडू घेतले होते.

5 / 6
दुसरीकडे, श्रीलंकेनं दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना 102 धावांनी गमावला. कुसल मेंडिस आणि दासुन शनाका व्यतिरिक्त एकही खेळाडू काही खास करू शकला नाही.

6 / 6
श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): कुसल परेरा, पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चरिथ असालंका, धनंजया डी सिल्वा, दासुन शानाका (कर्णधार), दुनिथ वेललागे, मथीशा पाथिराना, दिलशान मदुशंका, कसून राजितहा.