Cricket : माजी वेगवान गोलंदाजाच्या भाच्याची कर्णधारपदी नियुक्ती, टीम जाहीर, आणखी कुणाला संधी?

Hong Kong Sixes 2025: क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. हाँगकाँग सिक्सेस 2025 स्पर्धेसाठी पाकिस्तानने संघ जाहीर केला आहे. या स्पर्धेचा थरार 7 ते 9 नोव्हेंबर दरम्यान रंगणार आहे.

| Updated on: Oct 21, 2025 | 9:57 PM
1 / 5
आगामी हाँगकाँग सिक्सेस 2025 (Hong Kong Sixes 2025) स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेट टीमची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी एकूण 7 खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. अब्बास अफ्रीदी याला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. (Photo Credit : Instagram)

2 / 5
अब्बास अफ्रीदीने पाकिस्तानसाठी 24 टी 20i सामन्यांमध्ये 38 विकेट्स घेतल्या आहेत. अब्बास हा पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज उमर गुल याचा भाचा आहे. गुलने पाकिस्तानला 2009 साली टी 20i वर्ल्ड कप जिंकून देण्यात निर्णायक भूमिका बजावली होती. गुलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 427 विकेट्स मिळवल्या आहेत. (Photo Credit : INSTAGRAM)

3 / 5
हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेसाठी पाकिस्तान टीममध्ये अब्दुल समद, ख्वाजा मोहम्मद नफे, मोहम्मद शहजाद, साद मसूद, माझ सदाकट आणि शाहिद आजिज यांनाही संधी मिळाली आहे. (Photo Credit :INSTAGRAM)

4 / 5
हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेत दिनेश कार्तिक टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. या स्पर्धेत आर अश्विनही खेळणार आहे. टीम इंडियाला आतापर्यंत फक्त एकदाच 2005 साली या स्पर्धेचं विजेतेपद जिंकता आलं आहे. तर पाकिस्तान 5 वेळा या स्पर्धेत चॅम्पियन ठरली आहे. (Photo Credit : PTI)

5 / 5
हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेचे नियम वेगळे तितकेच इंटरेस्टिंग आहेत. या स्पर्धेतील सामने हे 6 ओव्हरचे असतात. एक गोलंदाज 1 ओव्हरच टाकू शकतो. तसेच अर्धशतक लगावल्यानंतर फलंदाजाला रिटायर होऊन मैदानाबाहेर जावं लागलं.  (Photo Credit : PTI)