
यंदाचा विश्वचषक भारतासाठी अतिशय खराब गेला. पहिले दोन सामने पराभूत झाल्यामुळे भारतीय संघ स्पर्धेत मागे पडला. भारत असणाऱ्या गटातून पाकिस्तान आणि नंतर न्यूझीलंड हे दोन्ही संघ पुढील फेरीत गेले असल्याने भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यामुळे सेमीफायनलमध्ये पोहचलेले चार संघ समोर आले आहेत.

भारत असणाऱ्या गटातून सर्वात आधी सेमीफायनलमध्ये गेलेल्या पाकिस्तान संघाने सर्वात उत्तम कामगिरी केली आहे. त्यांनी 5 पैकी 5 सामने जिंकत 8 गुणांसह सेमीफायनल गाठली आहे.

पाकिस्तान पाठोपाठ न्यूझीलंडचा संघही सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे, त्यांनी मात्र 5 पैकी 4 सामने जिंकत 8 गुणांसह पुढील फेरी गाठली आहे.

पाकिस्तानप्रमाणे सर्वात उत्तम कामगिरी ग्रुप 1 मधून इंग्लंडने केली आहे. त्यांनी 5 पैकी 4 सामने जिंकत 8 गुणांसह सेमीफायनल गाठली आहे.

ग्रुप 1 मधून इंग्लंडपाठोपाठ ऑस्ट्रेलियाचा संघही 5 पैकी 4 सामने जिंकत 8 गुण मिळवले असल्याने तोही सेमीफायनलमध्ये पोहचले आहेत.