Cricket : पाकिस्तान क्रिकेटचा जिवंत इतिहास काळाच्या पडद्याआड, वजीर मोहम्मद यांचं 95 व्या वर्षी निधन

Wazir Mohammad Death : क्रिकेट विश्वातून अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. पाकिस्तानचे दिग्गज आणि माजी फलंदाज वजीर मोहम्मद यांचं सोमवारी निधन झालं. वजीर मोहम्मद यांच्या निधनामुळे क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे.

Updated on: Oct 13, 2025 | 10:14 PM
1 / 5
पाकिस्तानचे सर्वात वयस्कर आणि माजी क्रिकेटपटू वजीर मोहम्मद याचं निधन झालं आहे. वजीर मोहम्मद यांनी वयाच्या 95 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. वजीर  मोहम्मद हे बर्मिंघममध्ये वास्तव्यास होते. (Photo Credit : Douglas Miller/Keystone/Getty Images)

2 / 5
वजीर मोहम्मद यांनी पाकिस्तानचं 1952 ते 1959 दरम्यान एकूण 20 कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं. तसेच वजीर पहिल्यांदा कसोटी मालिका खेळणाऱ्या पाकिस्तान संघातील हयात असलेले सदस्य होते. (Photo Credit : Central Press/Hulton Archive/Getty Images)

3 / 5
वजीर मोहम्मद यांनी निवृत्तीनंतरही क्रिकेटसह असलेलं नातं तोडलं नाही. वजीर मोहम्मद यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डासाठी सल्लागार म्हणून जबाबदारी पार पाडली. त्यानंतर ते ब्रिटेनला गेले. तिथेच त्यांची प्राणज्योत माळवली.  (Photo Credit : Twitter)

4 / 5
वजीर मोहम्मद यांनी कसोटी कारकीर्दीत अनेक अविस्मरणीय अशा खेळी केल्या होत्या. वजीर यांनी 1957- 58 च्या विंडीज दौऱ्यात पोर्ट ऑफ स्पेनमध्ये यजमानांविरुद्ध 189 धावांची खेळी केली होती. वजीर यांच्या या खेळीच्या जोरावर पाकिस्तानने या सामन्यात विंडीजवर मात केली होती. (Photo Credit : Twitter)

5 / 5
वजीर मोहम्मद यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये एकूण 105 सामने खेळले होते. वजीर मोहम्मद यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 40 पेक्षा अधिकच्या सरासरीने 4 हजार 930 धावा केल्या होत्या. तसेच 11 शतकं झळकावली होती. (Photo Credit : Twitter)