
गुणतालिकेत सहाव्या स्थानावर असलेल्या पंजाब किंग्ज संघाला 2025 च्या आयपीएलमध्ये पाच पैकी 3 सामने जिंकल्यानंतर सहा गुण मिळवले आहे. पण मागच्या सामन्या सनरायझर्स हैदराबादकडून 245 धावा करूनही 8 विकेट्सने पराभव पत्करावा लागला. विजय सहज होईल असं वाटत असताना पराभव झाला. असं असताना आता पंजाबला आणखी एक मोठा धक्का बसला.

सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यादरम्यान दुखापत झालेला पंजाब किंग्सचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन संपूर्ण हंगामासाठी बाहेर पडल्याची माहिती आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लॉकी फर्ग्युसनची दुखापत गंभीर आहे आणि पुढे खेळणे अशक्य आहे. म्हणूनच त्याने स्पर्धेतून माघार घेतल्याचे वृत्त आहे.

पंजाब किंग्सचे गोलंदाजी प्रशिक्षक जेम्स होप्स यांनी सांगितलं की, जखमी फर्ग्युसन संघात कधी परतेल हे सांगणे कठीण असल्याचे म्हटले आहे. या स्पर्धेत खेळणे त्याच्यासाठी जवळजवळ अशक्य आहे.

पंजाबकडून लॉकी फर्ग्युसनने चार सामन्यात पाच विकेट्स घेतल्या आहेत. मधल्या षटकांमध्ये संघाच्या गोलंदाजीच्या योजनेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या फर्ग्युसनची अनुपस्थिती संघासाठी मोठा धक्का आहे. संघात योग्य बदली खेळाडू नसल्यामुळे पंजाब चिंतेत पडला आहे.

अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू अझमतुल्लाह उमरझाई हा लॉकी फर्ग्युसनच्या जागी संघात खेळू शकतो. पण तो लॉकी फर्ग्युसनइतका गोलंदाजी करण्यास सक्षम नाही. त्यामुळे, फर्ग्युसनच्या जागी विजयकुमार वैशाखला संधी मिळण्याची शक्यता आहे. (सर्व फोटो- टीव्ही 9 कन्नड)