
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अखेर 31 जानेवारीला मायदेशात होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघाची घोषणा केली. मोहम्मद रिझवान पाकिस्तानचं नेतृत्व करणार आहे. तसेच माजी कर्णधार बाबर आझम याला मोठी जबाबदारी मिळाली आहे. पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी गतविजेता आहे. पाकिस्तानने 2017 मध्ये अंतिम फेरीत टीम इंडियाला पराभूत करत चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावली होती. (Photo Credit : Icc X Account)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बाबर आझम चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानसाठी ओपनिंग करु शकतो. बाबर फखर जमान याच्यासह ओपनिंगला येऊ शकतो. (Photo Credit : Babar Azam X Account)

बाबर आझम याने याआधी अनेकदा ओपनिंग केली आहे. फखर आणि बाबर हे दोघे अनुभवी खेळाडू आहेत. त्यामुळे या दोघांना ओपनिंग करण्याची संधी मिळू शकते. ( Photo Credit : Babar Azam X Account)

पाकिस्तानला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी ए ग्रुपमध्ये ठेवण्यात आलं आहे. या ए ग्रुपमध्ये टीम इंडिया, पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंडचा समावेश आहे. इंडिया-पाकिस्तान यांच्यात 23 फेब्रुवारीला महामुकाबला होणार आहे. त्यामुळे बाबरला ओपनिंग करण्याची संधी मिळाली तर त्याच्यासमोर टीम इंडियाच्या धारदार गोलंदाजांचा सामना करण्याचं आव्हान असेल. (Photo Credit : AFP)

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तान टीम : मोहम्मद रिझवान (कॅप्टन), बाबर आझम, फखर जमान, कामरान गुलाम, सौद शकील, तय्यब ताहिर, फहीम अश्रफ, खुशदिल शाह, सलमान अली आगा, उस्मान खान, अबरार अहमद, हरिस रौफ, मोहम्मद हसनैन, नसीम शाह आणि शाहीन शाह आफ्रिदी. (Photo Credit : Babar Azam X Account)