
आशिया कप स्पर्धेआधी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड मोठा निर्णय घेऊ शकते. सूत्रांच्या माहितीनुसार माजी क्रिकेटर मोहम्मद हफीज याची पाकिस्तान क्रिकेट टीमच्या निवड समिती अध्यक्षपदी वर्णी लागू शकते. मोहम्मद हाफीज याने 2021 मध्ये टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरचा सामना खेळला होता.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हफीजचं निवड समितीच्या अध्यक्षच्या शर्यतीत आघाडीवर आहे. निवड समिती प्रमुख हे पद जून महिन्यापासून रिक्त आहे.

पाकिस्तान टीम सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यानंतर हफीजची नियुक्ती केली जाऊ शकते. राशिद लतीफ यालाही चीफ सिलेक्टर पदासाठी विचारणा करण्यात आली. मात्र रशिदने नकार दिला.

मोहम्मद हफीज याने पाकिस्तानचं 55 टेस्ट, 218 वनडे आणि 119 टी 20 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. हफीजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 12 हजार पेक्षा अधिक धावा आणि 21 शतकं झळकावली आहेत.

मोहम्मद हफीज आयपीएलच्या पहिल्या मोसमात केकेआरसाठी खेळलाय. त्तकालिन कर्णधार सौरव गांगुली याने हफीजला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी दिली होती.