FIFA World Cup स्पर्धेचं 100वं वर्ष, असा आहे प्लान! अध्यक्ष जियानी इन्फेंटिनो म्हणाले…
फिफा वर्ल्डकप स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात असून तीन सामन्यानंतर नवा विजेता कोण ते ठरणार आहे. असं असताना फिफाचे अध्यक्ष जियाने इन्फेंटिनो यांनी 2030 वर्ल्डकपबाबत एक मोठं विधान दिलं आहे. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांची संख्या 48 वरून 64 करण्याचा मानस आहे.

फिफा वर्ल्डकप स्पर्धेचा आनंद प्रत्येक भारतीय रात्री जागून घेत आहे. पण यात भारतीय संघ नसल्याचं दु:ख देखील आहे. असं असताना फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फेंटिनी यांच्या एका वक्तव्याने आशा पल्लवित झाल्या आहेत. जियानी यांनी सांगितलं की, 2030 मध्ये होणाऱ्या वर्ल्डकप स्पर्धेत संघाची संख्या 64 केली जाण्याची शक्यता आहे. (PHOTO CREDIT- GETTY)

ईएसपीएन वेबसाइटनुसार, 64 संघांच्या विश्वचषकाची शक्यता सर्वप्रथम मार्च 2025 मध्ये समोर आली होती. जेव्हा दक्षिण अमेरिकन महासंघ CONMEBOL ने 2030 च्या स्पर्धेचा विस्तार करण्याचा प्रस्ताव दिला. कारण स्पर्धेचे शताब्दी वर्ष आहे.(PHOTO CREDIT- GETTY)

"जेव्हा तुम्ही विश्वचषक आयोजित करता, तेव्हा तो संपूर्ण जगासाठी आयोजित करणे महत्त्वाचे असते. हे केवळ युरोप आणि दक्षिण अमेरिकेसाठी नाही, तर खऱ्या अर्थाने संपूर्ण जगासाठी आहे. प्रत्येक देशाला विश्वचषकात सहभागी होण्याचे स्वप्न पाहता आले पाहिजे," असे फिफा अध्यक्ष म्हणाले.(PHOTO CREDIT- Fifa World Cup Twitter)

फिफाने 64 संघांच्या विश्वचषक स्पर्धेल मान्यता दिल्यास एकूण 128 सामने खेळवले जातील. 1998 ते 2022 पर्यंत वापरल्या गेलेल्या 32 संघांच्या स्वरूपातील सामन्यांच्या संख्येच्या दुप्पट असेल. या वर्षीच्या स्पर्धेत 104 सामने खेळवले जाणार आहेत. त्यापैकी 100 सामने खेळले गेले. (PHOTO CREDIT- Fifa World Cup Twitter)

2030 चा विश्वचषक प्रथमच बहुखंडीय स्पर्धा असेल, असं बोलले जात आहे. पहिले तीन सामने उरुग्वे, अर्जेंटिना आणि पॅराग्वे येथे खेळवले जातील. प्रत्येक देशात एक खेळला जाणार आहे. त्यानंतर उर्वरित सामने मोरोक्को, पोर्तुगाल आणि स्पेनमध्ये होतील. (Photo: FIFA World Cup Twitter)

भारतीय चाहत्यांसाठी ही बातमी आनंददायी आहे. कारण जेव्हा वर्ल्डकप स्पर्धेत 32 संघ खेळत होते तेव्हा आशियातून खूप कमी संघ निवडले जात होते. त्यामुळे भारताचं पात्र होणं कठीण होतं. त्यानंतर 48 संघ झाले तेव्हा भारताच्या आशा वाढल्या. आता 2030 मध्ये 64 संघ झाल्यास आशियाई देशांची संख्या वाढेल आणि भारताला संधी मिळण्याची शक्यता वाढेल. (PHOTO CREDIT- Indian Football Twitter)