Prithvi Shaw: आयपीएल मिनी लिलावापूर्वी पृथ्वीचा शो, वैभव सूर्यवंशीच्या शतकाची काढली हवा

Syed Mushtaq Ali Trophy: आयपीएल मिनी लिलाव 16 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. त्यामुळे सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतील खेळाकडे फ्रेंचायझींचं लक्ष लागून आहे. असं असताना महाराष्ट्राचा कर्णधार पृथ्वी शॉने आपल्या शतकी खेळीच्या जोरावर संघाला विजय मिळवून दिला.

Updated on: Dec 02, 2025 | 5:39 PM
1 / 5
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 स्पर्धेत महाराष्ट्र आणि बिहार हे संघ आमनेसामने आले. या सामन्यात वैभव सूर्यवंशीने 61 चेंडूत नाबाद 108 धावांची खेळी केली. पण त्याची ही खेळी व्यर्थ गेली असंच म्हणावं लागेल. कारण महाराष्ट्राचा कर्णधार पृथ्वी शॉने त्याच्या शतकावर पाणी टाकलं. (Photo- PTI)

2 / 5
कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर वैभव सूर्यवंशीने 7 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 108 केल्या. त्याच्या या खेळीच्या जोरावर बिहारने 20 षटकात 176 धावा केल्या.   (Photo- PTI)

3 / 5
बिहारने विजयासाठी ठेवलेल्या 176 धावांचं लक्ष्य महाराष्ट्रने 19.1 षटकात पूर्ण केलं. या विजयाचा शिल्पकार ठरला तो महाराष्ट्राचा कर्णधार पृथ्वी शॉ.. त्याने 30 चेंडूत 66 धावा केल्या. यावेळी त्याने 11 चौकार आणि 1 षटकार मारला.  (Photo- PTI)

4 / 5
सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत बिहारचा सलग तिसरा पराभव आहे. आतापर्यंत वैभव सूर्यवंशीचा झंझावात पाहायला मिळत आहे. पण संघाची कामगिरी मात्र सुमार आहे. वैभवने या स्पर्धेत आतापर्यंत काही विक्रम आपल्या नावावर केले आहेत.   (Photo- PTI)

5 / 5
वैभव सूर्यवंशी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत सर्वात कमी वयात शतक ठोकणारा फलंदाज ठरला आहे. त्याने 14 व्या वर्षीच शतकी खेळी करत मोठा कारनामा केला आहे.   (Photo- BCCI)