पुण्याच्या ऋतुराजनं न्यूझीलंडच्या नाकीनऊ आणले, शतकही नावावर

ऋतुराज गायकवाडनं न्यूझीलंडला पुणेरी दणका दिलाय. त्यानं नेमकं असं काय केलंय. याविषयी वाचा...

| Updated on: Sep 15, 2022 | 5:37 PM
1 / 5
बंगळुरूमध्ये न्यूझीलंड-अ विरुद्ध खेळल्या जात असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऋतुराज गायकवाड चांगलाच फॉर्ममध्ये आहे.  गायकवाडनं तिसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात शानदार शतक झळकावलंय.ऋतुराजचं प्रथम श्रेणी क्रिकेटमधील चौथे शतक आहे.विशेष म्हणजे या ऋतुराजनं न्यूझीलंडला पुणेरी दणका दिलाय.

2 / 5
नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या भारत-ए संघाची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार प्रियांक पांचालची विकेट लवकर गमावली. पांचाळ 54 चेंडूत 5 धावा करून बाद झाला.

3 / 5
यानंतर दुसरा सलामीवीर अभिन्यू इसवरनही 38 धावांवर बाद झाला. मात्र, गायकवाड क्रीजवर राहिला. तुफानी शैलीत फलंदाजी करताना त्याने 12 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने शतक पूर्ण केले.

4 / 5
न्यूझीलंड अ संघाविरुद्धच्या गेल्या दोन सामन्यात ऋतुराज गायकवाड 5 आणि 21 धावांवर बाद झाला होता पण आता तो फॉर्ममध्ये परतला आहे. विशेष म्हणजे तो चांगला खोळतोय.

5 / 5
न्यूझीलंड अ विरुद्धच्या शेवटच्या दोन कसोटी अनिर्णित राहिल्या आहे. यावेळी भारत अ संघ शेवटचा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल. भारत अ न्यूझीलंड अ विरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे.