राजस्थान रॉयल्सची साथ सोडत पंजाब किंग्सच्या प्रशिक्षकपदाची घेतली जबाबदारी, असा आहे रेकॉर्ड

आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी फ्रेंचायझीमध्ये बरीच उलथापालथ सुरु आहे. पंजाब किंग्सने नव्या गोलंदाज प्रशिक्षकाची घोषणा केली आहे. दिग्गज फिरकीपटू साईराज बहुतुलेच्या खांद्यावर ही भूमिका टाकली आहे. सुनील जोशीच्या जागी आता धुरा हाती घेणार आहे.

| Updated on: Oct 23, 2025 | 8:57 PM
1 / 5
पंजाब किंग्सने आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी आपल्या प्रशिक्षक स्टाफमध्ये बदल केला आहे. माजी क्रिकेटपटू साईराज बहुतुलेच्या खांद्यावर फिरकी गोलंदाज प्रशिक्षकाची जबाबदारी दिली आहे. बहुतुलेला नुकतंच राजस्थान रॉयल्सने पदमुक्त केलं होतं. त्यामुळे आता साईराज बहुतुले पंजाब किंग्सला मार्गदर्शन करणार आहे.  (फोटो-इंस्टाग्राम)

2 / 5
साईराज बहुतुले सुनील जोशी यांची जागा घेणार आहे. सुनील जोशी यांनी 2023 ते 2025 या कालावधीत पंजाब किंग्सला मार्गदर्शन केलं होतं. 51 वर्षीय साईराज बहुतुले यांनी बंगाल, केरळ, विदर्भ आणि गुजरात सारख्या संघांसोबत काम केलं आहे. बहुतुले यांच्याकडे प्रशिक्षणाचा चांगला अनुभव आहे.(फोटो-इंस्टाग्राम)

3 / 5
पंजाब किंग्सने साईराज बहुतुले यांचं स्वागत केलं आहे. सीईओ सतीश मेनन यांनी सांगितलं की, 'आम्ही सुनील जोशी यांनी काही वर्षे दिलेल्या मार्गदर्शनाबाबत आभारी आहोत. आता पुढेत आम्ही आमच्या प्रशिक्षण स्टाफमध्ये साईराज बहुतुले यांचं स्वागत करतो. त्यांचं सखोल ज्ञान आणि देशांतर्गत गोलंदाजांना घडवण्याची रणनिती आमच्या संघासाठी अमुल्य ठरेल.'(फोटो-इंस्टाग्राम)

4 / 5
साईराज बहुतुले यांनीही आनंद व्यक्त करत सांगितलं की, 'मी पुढच्या आयपीएल पर्वात फिरकी प्रशिक्षक म्हणून पंजाब किंग्ससोबत काम करण्यास उत्सुक आहे. ही एक अशी टीम आहे जी चांगल क्रिकेट खेळते. पंजाबकडे खूप प्रतिभावंत खेळाडू हेत. त्यांच्यासोबत काम करण्यास मी खूपच उत्साही आहे.'(फोटो-इंस्टाग्राम)

5 / 5
साईराज बहुतुले हे क्रिकेट विश्वातील मोठं नाव आहे. त्यांनी प्रोफेशनल क्रिकेटमध्ये 800 हून अधिक विकेट घेतल्या आहेत. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 630 विकेट आहे. तर लिस्ट एमध्ये 197 विकेट घेतल्या आहेत. (फोटो-इंस्टाग्राम)