
येत्या काही तासांमध्ये 4 दिग्गज आणि अनुभवी क्रिकेटर हे कीर्तीमान करणार आहेत. टीम इंडियाच्या एका खेळाडूसह एकूण 4 क्रिकेटर हे आपल्या कसोटी कारकीर्दीतील 100 वा सामना खेळणार आहेत.

टीम इंडियाचा आर अश्विन आणि इंग्लंडचा जॉनी बेयरस्टो यांच्यासाठी इंडिया-इंग्लंड पाचवा कसोटी सामना अविस्मरणीय असा राहणार आहे. तर न्यूझीलंडच्या केन विलियमसन आणि टीम साऊथी यांच्यासाठी ऑस्ट्रेलिया विरुद्धचा कसोटी सामनाही ऐतिहासिक असणार आहे. या चारही खेळाडूंच्या कारकीर्दीतील हा 100 वा कसोटी सामना असणार आहे.

आर अश्विन धर्मशालेत आपला 100 वा कसोटी सामना खेळण्यासाठी सज्ज आहे. अश्विन टीम इंडियासाठी 100 वा सामना खेळणारा 14 वा भारतीय ठरेल. अश्विनने आतापर्यंत 99 सामन्यांमध्ये 507 विकेट्स घेतल्या आहेत.

अश्विन या पाचव्या कसोटीत दिग्गज अनिल कुंबळेचा रेकॉर्ड ब्रेक करु शकतो.अश्विनला कुंबळेचा सर्वाधिक 35 वेळा 5 विकेट्स घेण्याचा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे. अश्विनने धर्मशालेत आणखी एकदा 5 विकेट्स घेतल्यास तो कुंबळेला मागे टाकेल आणि टीम इंडियासाठी सर्वाधिक 5 विकेट्स घेणारा भारतीय ठरेल.

न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज केन विलियमसन आणि अनुभवी गोलंदाज टीम साऊथी हे दोघेही 100 वा सामना खेळणार आहेत.आतापर्यंत न्यूझीलंडसाठी चौघांनी 100 कसोटी सामने खेळले आहेत.