
इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या सामन्यात किवींनी विजय मिळवला आहे. इंग्लंड संघाने दिलेल्या 283 धावांचं लक्ष्य किवींनी अवघ्या 36 व्या ओव्हरमध्ये पूर्ण केलं.

या सामन्यामध्ये न्यूझीलंडच्या डेव्हॉन कॉनवे आणि रचिन रवींद्र यांनी द्वि-शतकी भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला.

रचिन रवींद्र याने 96 चेंडूत 123 धावा केल्या यामध्ये 11 चौकार आणि 5 षटकार मारले. या शतकासह त्याने मोठे विक्रम आपल्या नावावर केलेत.

वर्ल्ड कपच्या इतिहासामध्ये शतक झळकावणारा सर्वात युवा फलंदाज ठरला आहे. वयाच्या २३ वर्षे ३२१ दिवसांत त्याने ही कामगिरी केली आहे.

पदार्पण सामन्यामध्ये शतक करणारा तो न्यूझीलंडचा पाचवा खेळाडू ठरला आहे. मात्र हे शतक खास आहे कारण वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात त्याने ही कामगिरी केली.