
इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात राजकोटमध्ये टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंग केली. टीम इंडियाची स्थिती 3 बाद 33 झाली. लोकल बॉल रवींद्र जडेजा याने कॅप्टन रोहित शर्मा याच्यासोबत निर्णायक भागीदारी करत टीम इंडियाचा डाव सावरला.

रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा या दोघांनी पहिल्या डावात शतकी खेळी केली. टीम इंडियाने या जोरावर पहिल्या डावात 445 धावा केल्या. इंग्लंडने प्रत्युत्तरात 319 धावा केल्याने टीम इंडियाला 126 धावांची आघाडी मिळाली.

रवींद्र जडेजाने 225 बॉलमध्ये 112 धावा केल्या. जडेजाच्या खेळीत 9 चौकार आणि 2 सिक्सचा समावेश होता. त्यानंतर जडेजाने बॉलिंगनेही धमाका केला.

जडेजाने इंग्लंड दुसऱ्या डावात 12.4 ओव्हर बॉलिंग केली. जडेजाने यामध्ये 41 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स घेतल्या. तर पहिल्या डावात 2 विकेट्स घेतल्या. जडेजाने अशाप्रकारे सामन्यात एकूण 7 विकेट्स आणि शतकी खेळी केली.

रवींद्र जडेजाच्या या ऑलराउंड कामगिरीसाठी त्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं. जडेजाने हा पुरस्कार त्याची पत्नी रिवाबा जडेजा हीला समर्पित केला. रवींद्र जडेजा याच्या वडिलांनी काही दिवसांपूर्वी त्यांची सून रिवाबावर आरोप केले होते. त्यामुळे जडेजाच्या वैयक्तिक आयुष्यात ही वादळ उठलं होतं. मात्र त्यानंतर जडेजाने इंग्लंड विरुद्ध शानदार कामगिरी करत आपल्या बायकोच्या पाठीशी राहत पुरस्कार तिला समर्पित केला.