
आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. तर चौकार मारण्याच्या बाबतीत शिखर धवन अव्वल स्थानावर आहे. पण चौकार आणि षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली अव्वल स्थानावर आहे. विराट कोहलीने दिल्लीविरुद्धच्या सामन्यात एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. (फोटो- आरसीबी ट्वीटर)

विराट कोहली दिल्लीविरुद्ध चौकार आणि षटकार मारत एक विक्रम प्रस्थापित केला आहे.. दिल्लीविरुद्ध त्याने एक चौकार आणि षटकार मारला आहे. यासह 1000 (चौकार/षटकार) पूर्ण करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. (फोटो- आरसीबी ट्वीटर)

कोहलीने या लीगमध्ये आतापर्यंत 249 डावांमध्ये 721 चौकार आणि 280 षटकार मारले आहेत. म्हणजेच त्याच्या नावावर एकूण 1001 (चौकार+षटकारांची) नोंद झाली आहे. विराट कोहलीने या सामन्यात 14 चेंडूत 1 चौकार आणि 2 षटकार मारत 22 धावा केल्या. (फोटो- आरसीबी ट्वीटर)

या यादीत दुसऱ्या स्थानावर शिखर धवन आहे. त्याने 211 डावांमध्ये 768 चौकार आणि 152 षटकार मारले आहेत. धवनच्या नावावर एकूण चौकार अधिक षटकारांची संख्या 920 आहे. (फोटो- बीसीसीआय)

कोहली सध्या आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. कोहली 2008 पासून आरसीबीसाठी सतत खेळत आहे. आतापर्यंत त्याने या संघासाठी खेळलेल्या 249 डावांमध्ये 8190 धावा केल्या आहेत. (फोटो- आरसीबी ट्वीटर)