
वुमन्स वर्ल्डकप स्पर्धेच्या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या विकेटकीपर ऋचा घोषबाबत मोठा खुलासा समोर आला आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने भरून येईल. कारण ऋचा घोष वेदना होऊनही उपांत्य आणि अंतिम फेरीत खेळली. तसेच भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. (Photo- PTI)

ऋचा घोषचे प्रशिक्षक शिव शंकर पॉल यांनी सांगितलं की, 'उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी ऋचा घोषच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटाला हेअरलाइन फ्रॅक्चर झालं होतं. पण तरीही तिने उत्कृष्ट फलंदाजी केली. वेदना सहन करून फलंदाजी केली. यावरून तिची मानसिक ताकद दिसून येते.' (Photo- PTI)

साखळी फेरीत न्यूझीलंडविरुद्धच्या करो या मरोच्या सामन्यात ऋचा घोषला विकेटकीपिंग करताना दुखापत झाली होती. तरीही ती मैदानात उतरली होती. तिने चौकार मारत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध आक्रमकपणे 26 धावा ठोकल्या. तर दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 34 धावांची खेळी केली. (Photo- PTI)

ऋचा घोषने वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील 8 सामन्यात 39.16 च्या सरासरीने 235 धावा केल्या. ऋचाचा स्ट्राईक रेट हा 130हून अधिकचा होता. इतकंच काय तर चार झेलही घेतले. ऋचा घोषने या स्पर्धेत एकूम 12 षटकार मारत मोठा विक्रमही नावावर केला आहे. (Photo- PTI)

ऋचा घोषने या स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली. भारतीय संघाच्या दृष्टीने तिचं योगदान मोलाचं ठरलं. पण आयसीसीच्या प्लेइंग 11 मध्ये तिला स्थान मिळालं नाही. तिच्या जागी पाकिस्तानच्या सिदरा नवाजला निवडलं आहे. कारण तिने 4 झेल आणि 4 यष्टीचीत केल्या होत्या. (Photo- PTI)