IPL 2026: रिंकु सिंहने मोडला महेंद्रसिंह धोनीचा विक्रम, 15 वर्षानंतर केली अशी कामगिरी
आयपीएल 2026 स्पर्धेतील 38व्या सामन्यात रिंकु सिंहची कामगिरी लक्षवेधी ठरली. त्याने लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी, क्षेत्ररक्षणात कमाल केली. हा सामना कोलकात्याने सुपर ओव्हरमध्ये जिंकला. यासह त्याने महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडीत काढला.

आयपीएल 2026 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या रिंकु सिंहची खेळी महत्त्वाची ठरली. त्याच्या खेळीमुळे कोकात्याला विजयाची चव चाखता आली. सामन्यात रिंकु सिंहने इतिहास रचला. त्याने महेंद्रसिंह धोनीचा 15 वर्षे जुना विक्रम मोडीत काढला. (Photo: IPL/BCCI)

लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सची स्थिती नाजूक होती. या सामन्यात रिंकु सिंह सहाव्या स्थानावर फलंदाजीला आला. त्याने अवघ्या 51 चेंडूत 5 षटकार आणि 7 चौकारांसह नाबाद 83 धावा केल्या. (Photo: IPL/BCCI)

आयपीएल इतिहासात सहाव्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करण्याचा मान आता रिंकु सिंहला मिळाला आहे. त्याने सहाव्या क्रमांकावर उतरून 83 धावांची खेळी केली. यासह त्याने चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडीत काढला. (Photo: IPL/BCCI)

आयपीएल 2011 स्पर्धेत महेंद्रसिंह धोनीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूद्धच्या सामन्यात सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. यावेळी त्याने नाबाद 70 धावांची खेळी केली होती. हा सहाव्या क्रमांकावर वैयक्तिक सर्वोच्च धावा होत्या. पण आता रिंकुच्या नावावर हा विक्रम नोंदवला गेला आहे. (Photo: IPL/BCCI)

रिंकु सिंहला सामनावीराचा पुरस्कार मिळाल्यानंतर त्याने सांगितलं की, जेव्हा मी फलंदाजीला जातो आणि संघाच्या 3-4 विकेट्स पडलेल्या असतात, तेव्हा खेळ नियंत्रणात ठेवून तो पुढे कसा न्यायचा यावर माझं लक्ष असतं. मी स्ट्राईक रोटेट कसा करायचा, एकेरी आणि दुहेरी धावा कशा घ्यायच्या आणि चौकार कुठे मारता येतील याचा विचार करतो. खेळ शेवटपर्यंत नेणं हेच माझं मुख्य ध्येय असतं. (Photo: IPL/BCCI)