कसोटी क्रिकेटमध्येही फिनिशर रिंकु सिंहची कमाल, ठोकलं जबरदस्त शतक

रणजी ट्रॉफी 2025-2026 स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत उत्तर प्रदेश विरुद्ध आंध्र प्रदेश यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात उत्तर प्रदेशकडून पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या रिंकु सिंहने शतकी खेळी केली. तसेच कसोटीतही चमकदार कामगिरी करू शकतो हे दाखवून दिलं.

| Updated on: Oct 18, 2025 | 5:32 PM
1 / 5
रणजी ट्रॉफी 2025-2026 स्पर्धेच्या एलिट अ ग्रुपमध्ये कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानात उत्तर प्रदेश विरुद्ध आंध्र प्रदेश हा सामना सुरु आहे. . या सामन्यात रिंकु सिंहने चमकदार कामगिरी करत शतक ठोकलं.   (फोटो- Pankaj Nangia/Getty Images)

2 / 5
या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर आंध्र प्रदेशचा कर्णधार रिकी भुईने फलंदाजीचा निर्णय घेतला. आंध्र प्रदेशने पहिल्या डावात  470 धावा केल्या. श्रीकर भरतने 142 आणि शेख रशीदने 136 धावांची खेळी केली. (फोटो- PTI)

3 / 5
आंध्र प्रदेशने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना उत्तर प्रदेशने सावध सुरुवात केली. माधव कौशिकने 54 धावा केल्या. तर तिसऱ्या क्रमांकावर उतरलेल्या आर्यन जुआलने 66 धावांची खेळी केली. पाचव्या क्रमांकावर उतरलेल्या रिंकुनेही जबरदस्त फलंदाजी केली.  (Photo: PTI)

4 / 5
रिंकु सिंहने 180 चेंडूत 2 षटकार आणि 9 चौकारांसह शतक पूर्ण केलं. त्याने या सामन्यात 273 चेंडू खेळले आणि नाबाद 165 धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे हा सामना ड्रॉ झाला. उत्तर प्रदेशने पहिल्या डावात 470 धावांचा पाठलाग करताना 8 गडी गमवून 471 धावा केल्या. ( Photo: Pankaj Nangia-ICC/ICC via Getty Images)

5 / 5
सध्या रणजी ट्रॉफीमध्ये खेळणाऱ्या रिंकू सिंगची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी निवड झाली आहे. ही मालिका 29 ऑक्टोबरपासून सुरू होईल. त्यामुळे उत्तर प्रदेश संघाच्या तिसऱ्या सामन्यासाठी रिंकू सिंग नसणार आहे. (Photo: AFP)