RR vs DC : मैदानात उतरताच दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने नोंदवला खास विक्रम

| Updated on: Mar 28, 2024 | 8:20 PM

आयपीएलमधील नववा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होत आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतसाठी हा सामना खास आहे. ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्ससाठी 2016 पासून खेळत आहे. आता एका खास विक्रमाची नोंद केली आहे.

1 / 6
आयपीएल स्पर्धेत आज राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने आहेत. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर सामना सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल होताच ऋषभ पंतच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. दिल्ली कॅपिटल्ससाठी अशी कामगिरी आतापर्यंत कोणीच केलेली नाही.

2 / 6
वर्षभरानंतर क्रिकेटच्या मैदानावर परतणाऱ्या ऋषभ पंतचा दिल्ली संघासाठी हा 100 वा सामना आहे. दिल्ली कॅपिटल्ससाठी सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू ठरला आहे.

3 / 6
ऋषभ पंतने 2016 मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघात सहभागी झाला होता. तेव्हापासून आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळत आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्धचा सामना हा ऋषभ पंतच्या कारकिर्दितील 100 वा सामना आहे.

4 / 6
ऋषभ पंतने आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्ससाठी 99 सामन्यात 34.41 च्या सरासरीने 2856 धावा केल्या आहेत. यामध्ये 15 अर्धशतक आणि 1 शतकाचा समावेश आहे.

5 / 6
ऋषभ पंतने 2021 मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचे कर्णधारपद स्वीकारले आणि संघाला एकदाच अंतिम फेरीत नेले. आता या स्पर्धेत पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. आता पहिल्या विजयाची नोंद कधी करणार याची प्रतीक्षा आहे.

6 / 6
ऋषभ पंतनंतर दिल्ली कॅपिटल्ससाठी अमित मिश्राने 99 सामने, श्रेयस अय्यर 87 सामन्यांसह तिसऱ्या, डेव्हिड वॉर्नर 82 सामन्यांसह चौथ्या स्थानावर आहे.