ऋषभ पंतचा हातून मोठी संधी सुटली, आता 60 दिवस पाहावी लागणार वाट; काय ते जाणून घ्या

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतच्या पायाला जबर दुखापत झाली. यामुळे पाचव्या कसोटी सामन्यात खेळणार नाही. त्यामुळे त्याच्या हातून मोठ्या विक्रमाची संधी हुकली आहे.

| Updated on: Jul 30, 2025 | 11:02 PM
1 / 6
भारत इंग्लंड कसोटी मालिकेतील पाचव्या कसोटी सामन्यात ऋषभ पंत खेळणार नाही. चौथ्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतला पायाला बोटाला फ्रॅक्चर झालं आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला सहा आठवडे विश्रांतीचा सल्ला दिला आहे. (फोटो- बीसीसीआय/बीसीसीआय ट्वीटर)

2 / 6
इंग्लंडविरुद्धच्या चार कसोटी सामन्यात ऋषभ पंतने जबरदस्त फलंदाजी केली. त्याने 479 धावा केल्या. यात दोन शतकं आणि तीन अर्धशतकांचा समावेश होता. तसेच 17 षटकार आणि 49 चौकार मारले. (फोटो- बीसीसीआय/बीसीसीआय ट्वीटर)

3 / 6
ऋषभ पंतला आता पुन्हा कसोटी सामना खेळण्यासाठी ऑक्टोबरपर्यंत वाट पाहावी लागेल. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका असणार आहे. ही मालिका 2 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. पंत या मालिकेत खेळून वीरेंद्र सेहवागचा षटकाराचा मोठा विक्रम मोडू शकतो. (फोटो- बीसीसीआय/बीसीसीआय ट्वीटर)

4 / 6
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम सलामीवीर वीरेंद्र सेहवागच्या नावावर आहे. त्याने 178 डावात 90 षटकार मारले आहेत. त्याच्या 12 वर्षापूर्वीच्या विक्रमाची त्याने बरोबरी केली आहे. (फोटो- बीसीसीआय/बीसीसीआय ट्वीटर)

5 / 6
इंग्लंडविरुद्धच्या 4 कसोटी सामन्यांमध्ये ऋषभ पंतने एकूण 17 षटकार मारले आहेत. यासह 82 डावांमध्ये टीम इंडियासाठी एकूण 90 षटकार मारले आहेत. जर ऋषभ पंतने पुढील कसोटी मालिकेत फक्त एक षटकार मारला तर तो भारतासाठी कसोटीत सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनेल. या अद्भुत विक्रमाची बरोबरी करण्यासाठी ऋषभ पंतला 2 ऑक्टोबरपर्यंत वाट पहावी लागेल. (फोटो- बीसीसीआय/बीसीसीआय ट्वीटर)

6 / 6
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम बेन स्टोक्सच्या नावावर आहे. स्टोक्सने 206 डावात एकूण 136 षटकार मारले आहेत. पंत आता 90 षटकारांसह या यादीत आठव्या स्थानावर आहे. आगामी कसोटी मालिकेत 10 षटकार मारले तर तो कसोटी इतिहासात 100 षटकार मारणारा पहिला भारतीय आणि जगातील चौथा फलंदाज बनेल.(फोटो- बीसीसीआय/बीसीसीआय ट्वीटर)